पुणेकरांचा टाळेबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेकरांचा टाळेबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद

राज्यासहित पुण्यातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून ’वीकएंड लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली.

कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
सचोटीने कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती : करण ससाणे
तवांग सीमेवर भारत-चीन सैनिकांत चकमक

पुणे/प्रतिनिधीः राज्यासहित पुण्यातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून ’वीकएंड लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला त्या दोन दिवसांत पोलिसांनी विनाकारण फिरणार्‍या लोकांवर कारवाई केली होती. पण आता पुणेकरांनी टाळेबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. 

 पुणेकरांनी अशीच साथ दिली, तर आपण सगळे मिळून कोरोनाला नकीच हरवू, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला. सर्वानी नियमांचे आजच्याप्रमाणेच पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिक फक्त सकाळच्या वेळेतच जॉगिंगसाठी बाहेर येत आहेत. त्यांनी या काळात तरी घरात बसावे. आम्हाला कारवाई करण्याची वेळ आणून देऊ नये, असे पोलिसांनी सांगितले. पुण्यात मागील आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. एका दिवसांत तब्ब्ल सहा-सात हजार रुग्ण आढळून येत होते. त्याच तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाणही कमी होते; पण गेल्या चार, पाच दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत थोडयाफार प्रमाणात घट होत आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढत चालले आहे. 23 एप्रिलला चार हजार 465 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, तर पाच हजार 634 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. काल दिवसभरात तीन हजार 991 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर चार हजार 789 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. सद्यस्थितीत प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आम्हाला पूर्वी वाहतुकीचे नियम मोडणार्‍या नागरिकांवर कारवाई करावी लागत होती. आता विनाकारण बाहेर पडणार्‍या लोकांची विचारपूस करावी लागत आहे. आज मात्र रस्त्यावर नागरिक दिसून आले नाहीत. याचप्रमाणे दररोज नियमांचे पालन ते करतील, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

COMMENTS