कोरोनाची लाट कायम ; दिवसभरात 1206 रुग्णांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाची लाट कायम ; दिवसभरात 1206 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यात येत असल्याचे पाहून विविध निर्बंध शिथील केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून य

कोरोना काळात उद्योगाचे अर्थचक्र सुरू राहावे – ठाकरे l DAINIK LOKMNTHAN
कोरोना पाठोपाठ आता ह्या रोगाने घातले थैमान …तब्बल ८४ जणांना लागणl LokNews24
देशभरात कोरोनामुळे एक लाख 19 हजार मुले अनाथ

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यात येत असल्याचे पाहून विविध निर्बंध शिथील केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात काल 42 हजार 766 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात तब्बल 1206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यामध्ये 53 टक्के कोरोना रुग्ण असल्याचे आरोग्यमंत्रालयाने सांगितले. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 07 लाख 95 हजार 716 वर पोहचली. देशात सध्या 4 लाख 55 हजार 033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 1206 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या 4 लाख 07 हजार 145 वर पोहचली. शुक्रवारी 45 हजार 254 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 99 लाख 33 हजार 538 वर पोहचलीय. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण 37 कोटी 21 लाख 96 हजार 268 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील 30 लाख 55 हजार 802 लसीचे डोस शुक्रवारी एका दिवसात देण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दलेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2021 पर्यंत देशात एकूण 42 कोटी 90 लाख 41 हजार 970 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 19 लाख 55 हजार 225 नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

COMMENTS