मोदींनी प्रस्ताव नसताना गुजरातला मदत ; अजित पवार यांची टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदींनी प्रस्ताव नसताना गुजरातला मदत ; अजित पवार यांची टीका

पंतप्रधानांनी फक्त गुजरातलाच मदत जाहीर केली असून महाराष्ट्राचा दौरा रद्द केला, असा आरोप उपुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

कोरोना संकट काळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी शासनाचे व्यापक प्रयत्न : राज्यपाल
अहमदनगर : एमआयडीसीत गुंड लोकांचा त्रास… शिवसेनेची उद्योगमंत्र्यांकडे तक्रार…
अबब… आमदारांच्या पगाराला लागतात ५ अब्ज

पुणे/प्रतिनिधीः पंतप्रधानांनी फक्त गुजरातलाच मदत जाहीर केली असून महाराष्ट्राचा दौरा रद्द केला, असा आरोप उपुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. गुजरातचा मदतीचा प्रस्ताव नसतानाही मदत केली गेली, असे ते म्हणाले. पुण्यामध्ये पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. 

    भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व राज्यांना मोदी यांनी मदत केल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीवर राहावेत, यासाठी शुभेच्छा असे म्हणत टोला लगावला होता. याच पार्श्‍वभूमीवर पवार म्हणाले, की वादळ होते, त्या वेळी मी नियंत्रण कक्षात बसून होतो. नुकसानीची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात होतो. पालकमंत्र्यानी तिथे दौरे केले. तुलनात्मक या वादळाची तीव्रता कमी होती. मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आला होता; पण तो दौरा रद्द झाला. नंतर ते थेट गुजरातला गेले. देशात महाराष्ट्र पण राज्य आहे, जसे गुजरात राज्य आहे. इथे आले असते. मदतीचा आकडा जाहीर झाला असता तर बरे वाटले असते. नितीन राऊत यांच्यांशी झालेल्या जीआर बाबतच्या वादाबाबत विचारल्यावर पवार चिडले. ते म्हणाले, की राऊत यांच्या बद्दल, तसेच जीआरबाबत मला माहिती नाही. त्यांनी काय सांगितले, हे मला माहिती नाही. उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर ऐकावे लागते. अजून अंतिम निर्णय झालेला नाही. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ. महाविकासआघाडी सरकारची काही भूमिका आहे. सरकार दुर्लक्ष करते, अशी भावना होऊ देणार नाही. त्यांचे वेगळे मत असेल तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुढील बेंचकडे जाता येते. संभाजीराजे यांनी सारथीबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, की प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. संस्थेला जागा नव्हती ती घेतली. आता मदत होत आहे. जलसंपदा विभागाची जागा पण देत आहोत. माझी आणि त्यांची भेट झाली, तर माझ्यावर जबाबदारी आल्यावर मी काय काय केले हे सांगेन.

COMMENTS