Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजरीवालांची अटक भाजपवरच उलटणार

खासदार शरद पवारांची भाजपवर टीका

मुंबई ः दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक

कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल
द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकसाठी 50 टक्के अनुदान द्यावे ः खा. शरद पवार
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ः खा. शरद पवार

मुंबई ः दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेचा विरोधकांनी तीव्र निषेध केला आहे. खासदार शरद पवार यांनी देखील शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला. तसेच केजरीवालांची अटक भाजपवरच उलटेल असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

पवार म्हणाले, मोदी सरकारने ईडी आणि सीबीआयला देशभरातल्या विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या मागे लावले आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी थेट वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमुखांना अटक करण्याचं सत्र सुरू केले असे दिसून येत आहे. त्यांनी आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारचं एक धोरण ठरवले म्हणून अशा प्रकारे अटक करणे चुकीचे आहे. अरविंद केजरीवालांना केलेली ही अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल. याचा 100 टक्के भाजपलाच फटका बसेल. भाजपला या अटकेची मोठी किंमत मोजावी लागेल. अरविंद केजरीवाल हे एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. तरीसुद्धा लोकांचा विश्‍वास संपादन करून ते तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या मागील दोन्ही निवडणुकांमध्ये (2015, 2020 मधील दिल्ली विधानसभा निवडणुका) त्यांना 90 टक्के मती मिळाली आहेत. त्याआधीच्या निवडणुकीतही त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली होती. निवडणूक काळात भाजपने आम आदमी पार्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीतल्या जनतेने आपवरच विश्‍वास दाखवला. याचा अर्थ दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांचे नेतृत्व मान्य आहे. परंतु, तुम्ही (भाजप) एका चांगल्या माणसाला तुरुंगात टाकता, त्याचा लोकशाहीचा अधिकार हिरावता, हे लोकांना आवडलेले नाही. हे सगळे केवळ निवडणुकीसाठी चालू आहे. शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून विरोध करण्याची हिंमत दाखवतात. हेच भाजपला सहन होत नाही. परंतु, आता इंडिया आघाडीने भूमिका घेतली आहे की, आपण केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहायचे. तमिळनाडू आणि झारखंडमध्ये जे झाले तेच आता दिल्लीत होत आहे. उद्या हे देशभरात इतर ठिकाणी देखील होईल. भाजपने देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी भाजपाचा हा सगळा खटाटोप चालू असल्याची टीका पवार यांनी केली आहे.

COMMENTS