देशभरात कोरोनामुळे एक लाख 19 हजार मुले अनाथ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात कोरोनामुळे एक लाख 19 हजार मुले अनाथ

जगात 15 लाखांहून अधिक मुलांनी गमावले आई-वडीलनवी दिल्ली/मुंबई ः कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये अनेक बालकांना आपल्या माता-पित्यांना मुकावे लागले आहे. ग

कोरोना पाठोपाठ आता ह्या रोगाने घातले थैमान …तब्बल ८४ जणांना लागणl LokNews24
कोरोनाची लाट कायम ; दिवसभरात 1206 रुग्णांचा मृत्यू
कोरोना काळात उद्योगाचे अर्थचक्र सुरू राहावे – ठाकरे l DAINIK LOKMNTHAN

जगात 15 लाखांहून अधिक मुलांनी गमावले आई-वडील
नवी दिल्ली/मुंबई ः कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये अनेक बालकांना आपल्या माता-पित्यांना मुकावे लागले आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे जगातील 21 देशात आतापर्यंत जवळपास 15 लाख लहान मुले अनाथ झाली आहेत. याबाबतची माहिती द लँन्सेटमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यानुसार, 15 लाखांहून अधिक मुलांनी कोरोनामुळे त्यांच्या आई वडिलांना गमावलं आहे. तर भारतात हीच संख्या 1 लाख 19 हजार इतकी आहे.
जगाचा विचार केला तर जगभरात 15 लाखांपेक्षा जास्त मुलांना आपले आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या संकटात अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे, हजारो बालकांना आपल्या माता-पित्यांना मुकावे लागले आहे. भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021 दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ज्या मुलांनी आई वडील अथवा आपले पालक गमावले आहेत, त्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर खोलवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. त्यांनी, आजार, शारीरिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि किशोरवयीन गर्भधारणेच्या जोखमेबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. ज्या देशांत मुलांचे पालक गमावण्याचे प्रमाण जास्त आहे, त्या देशात दक्षिण आफ्रीका, पेरू, अमेरिका, भारत, ब्राझील आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची देखभाल करणार्‍या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण काही देशात जास्त आहे. अशा देशात पेरू, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, ब्राझील, कोलंबिया, इरान, अमेरिका, अर्जेंटिना आणि रशिया यांचा समावेश आहे. कोरोना रुग्ण मृत्यू संख्येत मागील 24 तासांमध्ये पुन्हा वाढ झाली. 3 हजार 998 कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडली, तर 42 हजार 15 नवे रुग्ण आढळले. एकीकडे कोरोना रुग्ण मृत्यू वाढले तर 36 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांपेक्षा पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने चिंता कायम राहिली आहे.

नाथ बालकांची जबाबदारीसाठी राष्ट्रवादीचा पुढाकार
राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी घोषणा करत, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. त्यासोबतच जवळच्या व्यक्तीचे प्रेम, आधार, पाठिंबा मिळावा यासाठी राष्ट्रवादी जीवलग उपक्रमांतर्गत 450 ’राष्ट्रवादी सेवादूत’ या मुलांचे पालक बनणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

COMMENTS