Homeताज्या बातम्यादेश

हेट स्पीचप्रकरणी केंद्राला फटकारले

हिंसाचार आणि द्वेषपूर्ण वक्तव्य रोखण्यासाठी उपाययोजना करा ः सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः मणिपूरनंतर हरियाणा राज्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. य

विविध मागण्यांसाठी हिवताप कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन
धुलीवंदनाची अनोखी परंपरा, जावयाची गाढवावरून मिरवणूक
घरांच्या विक्रीमध्ये 64 टक्के वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः मणिपूरनंतर हरियाणा राज्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी  सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खन्ना यांनी हरियाणा आणि केंद्र सरकारला फटकारत हिंसाचार आणि द्वेषपूर्ण वक्तव्य होवू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.
नूंहमध्ये पसरलेल्या हिंसाचारामुळे हरियाणात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खन्ना यांनी मुख्य कारण काय, अशी विचारणा केली. त्यावर याचिकाकर्त्याचे वकील सीयू सिंह म्हणाले की, हे एका समुदायाविरुद्ध हेट स्पीच प्रकरण आहे. सभा घेऊन हेट स्पीच दिले जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले की, हेट स्पीच संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन करावे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तसेच हिंसाचार किंवा हेट स्पीच होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहे. दरम्यान तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. संवेदनशील भागात अतिरिक्त खबरदारी घेण्यात यावी, तसेच अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करून सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफी करण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. नूंह प्रकरणात सरन्यायाधीशांसमोर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, रजिस्ट्रारला तात्काळ मेल पाठवा, आम्ही तात्काळ या प्रकरणाच्या सुनावणीचे आदेश देऊ. सीयू सिंह यांनी म्हटले की, नूंहमध्ये स्थिती गंभीर आहे. दिल्ली एनसीआरमध्ये 23 सभा होत आहेत, त्यावर लवकर सुनावणी होणे गरजेचे आहे. शिवाय शेजारच्या राज्यातही हिंसाचार झाला आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, हेट स्पीचमुळे वातावरण बिघडते यात वाद नाही. कायद्याचे राज्य राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. नूंहमध्ये उसळलेला जातीय हिंसाचार गुरुग्रामसह राज्याच्या अनेक भागात पसरला आहे.

हरियाणा हिंसाचारात 41 एफआयआर, 116 अटकेत – हरियाणाच्या नूंहमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीला लागूनच असलेल्या गुरुग्राममध्येही जोरदार राडा झाला. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवली तर 112 या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन गुरुग्रामचे पोलिस अधिकारी वरूण कुमार यांनी केले आहे. हरियाणाचे डीजीपी पी. के. अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. आतापर्यंत 41 एफआयआर दाखल करण्यात आले असून, 116 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या 20 तुकड्या मदतीला होत्या. त्यातील तीन पलवल, एक फरिदाबाद, 1 गुरुग्राम आणि उर्वरित 14 या नूंहमध्ये तैनात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

COMMENTS