आज १३ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आज १३ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

१३ ऑगस्ट राशी

मेष वृषभ मिथुन :- कर्क :- सिंह :- कन्या :- तूळ :- वृश्चिक :- धनू :- मकर :- कुंभ :- मीन :-

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष

स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.शुभ रंग पांढरा   
शुभ अंक ९

वृषभ

मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.शुभ रंग गुलाबी  
शुभ अंक ३

मिथुन :-

आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.शुभ रंग पोपटी   
शुभ अंक ४

कर्क :-

परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.शुभ रंग विटकरी 
 शुभ अंक ८

सिंह :-

कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.शुभ  रंग जांभळा  
शुभ अंक  ५

कन्या :-

मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.शुभ रंग लाल   
शुभ अंक २

तूळ :-

नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.शुभ रंग निळा  
शुभ अंक ६

वृश्चिक :-

आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.शुभ रंग हिरवा  
शुभ अंक ४

धनू :-

आज कामातून चांगला लाभ होईल. रेस, जुगार यातून नफा कमवाल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.शुभ रंग पिवळा  
शुभ अंक ९

मकर :-

व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.शुभ रंग काळा  
शुभ अंक ७

कुंभ :-

मनाचा तोल सांभाळावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.शुभ रंग नारंगी 
शुभ अंक ३

मीन :-

शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.शुभ रंग लाल   
शुभ अंक १



COMMENTS