छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात अश्लिल चाळे करणार्‍यांवर कारवाई करावी- मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

Homeशहरंअहमदनगर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात अश्लिल चाळे करणार्‍यांवर कारवाई करावी- मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

नगर -  स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंपिरियल चौकातील पुतळ्याच्या आसपास उघड्यावर अश्लिल चाळे करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी माग

सावन बरवालची 48 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत42 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 तास 11 मिनिटांत केले पार
कोपरगाव औद्योगिक वसाहतीची सर्वसाधारण सभा उत्साहात
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

नगर – 

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंपिरियल चौकातील पुतळ्याच्या आसपास उघड्यावर अश्लिल चाळे करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी पोलिस निरिक्षक संपत शिंदे, मनसे विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, संकेत जरे, प्रमोद ठाकूर, धिरज सारसर, पांडूरंग पालवे, प्रविण गायकवाड आदि उपस्थित होते.

     पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. कारण या परिसरात संध्याकाळ पासून काही महिला वेश्याव्यवसायाच्या दृष्टीने उभ्या असतात आणि काही आंबटशौकीन माणसं त्या ठिकाणी महिलांसोबत नको ते चाळे करत उभे असतात. जुन्या बसस्थानकापासून ते थेट जिल्हा परिषदेच्या आवारापर्यंत या करामती चालत असतात. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पोलिसांच्या गाडीच्या टायमिंग वर सर्व काही खेळ त्या ठिकाणी चालू असतो. हा विषय या आधी प्रशासनाला माहिती नसेल असेही नाही, पण कोणत्या कारणामुळे या गोष्टींकडे डोळेझाक करण्यात आली, याची देखील आपण चौकशी करावी. संबंधित महिला त्या ठिकाणी ज्या उद्देशाने उभ्या असतात, त्या अवैध धंद्यांसाठी ती जागा नाही, त्या जागेचे पावित्र्य हे कायम राखले गेले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड स्वराज्याचे आराध्य दैवत आणि हा तमाम मावळ्यांच्या भावनेचा विषय आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अन्यथा महाराजांच्या मावळ्यांनी हा विषय हाती घेतला तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल, या विषयांचा गांभिर्याने विचार व्हावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS