Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या रश्मी बर्वें यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द

नागपूर ः जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना सलग दूसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने उमेदव

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताची 5 सुवर्णांसह 16 पदकांची कमाई
पत्रकार सोमनाथ कचरे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
गणेश ढाकणे यांची औषध निरीक्षकपदी निवड; ११ वर्षांचे परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मिळवले यश!

नागपूर ः जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना सलग दूसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर आता याच कारणामुळं त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द झाले आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून या निर्णयामुळे बर्वे यांना सलग दुहेरी धक्का बसला आहे.

COMMENTS