Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेती मालाचे भाव स्थिर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात

अंबाजोगाई प्रतिनिधी - निसर्गाचा लहरीपणा, अवेळी येणारा पाऊस, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर, शेतीतील वाढता खर्च, यामुळे शेती फायद्याची ठरण्याऐवजी त

सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडून एफआरपी पूर्ण
टोमॅटोने शेतकऱ्याला केले श्रीमंत
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राज्यातील 110.39 लाख लाभार्थींना रक्कम रू. 23607.94 कोटी लाभ अदा

अंबाजोगाई प्रतिनिधी – निसर्गाचा लहरीपणा, अवेळी येणारा पाऊस, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर, शेतीतील वाढता खर्च, यामुळे शेती फायद्याची ठरण्याऐवजी तोटे्ेयाची ठरत आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेती करण्यासाठी उत्साह येत नाही. की काय, अशी शंका निर्माण होत आहे.
वारंवार येणार्या संकटापुढे हवालदिल झालेला शेतकरी शेती करण्यापेक्षा ती शेती दुसर्यांना अर्धाने शेती देण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ज्यांना शेतीशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी शेती दुसर्यांना सोबत घेऊन ती कसण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु शासनाचे दुर्लक्ष व निसर्गाच्या अवकृपेमुळे बिनभरवशाची झालेली शेती यामुळे हा कणा  मोडू पाहात आहे. कोरडवाहू शेती करणार्या शेतकर्याला पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. बँका, सावकारी कर्ज काढून बहुते शेतकरी शेती करतात. मात्र, लागवड खर्च व उत्पन्न याचा ताळेबंद अखेर तोट्याचा येतो. परिणामी अनेक शेतकरी कर्जाची मुद्दलही भरू शकत नाहीत. सद्य:स्थितीत शेती करणे म्हणजे जुगार खेळण्यासारखीच परिस्थिती बनली आहे. पूर्वी शेतकर्यांकडे गोधन असायचे. त्यापासून शेतात राबवण्यासाठी बैल तयार व्हायचे, मात्र दिवसेंदिवस चाराटंचाईची समस्या शेतकर्यांना भेडसावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनही पाहिजे तसे हातात येत नसल्याने आर्थिक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेती करण्यापेक्षा ती अर्धालीने  देणेकेव्हाही परवडणारे आहे. सालगड्याचे न परवडणारे  वेतन, शेतीसाठी आवश्यक बैल जोडीच्या किंमतीही लाखांच्या घरात पोहोचल्याने सर्वांचाच कल आता ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, पेरणी आदी शेतीची कामे यंत्राद्वारे करून घेत असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर मजूर टंचाईसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. बी-बियाणे, खते यांच्याही किंमती वाढल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडत आहेत. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे घटलेल्या उत्पादनाला बाजारातही भाव मिळत नसल्याने शेतकर्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण होऊन बसले आहे. शासनाकडून शेतकर्यांसाठी राबवत असलेल्या लाभदायी कृषी योजना या बंद झाल्यातच जमा आहे. त्यातच संकटकाळात आर्थिक मदत व्हावी, यासाठी काढलेला विमा शेतकर्यांना पीक विमा हप्ता भरूनही मिळत नाही. याकडे अनेक तक्रारी करूनसुद्धा प्रशासन व शासन विमा कंपनीचे दलाल बनवून काम करतात की काय, अशी परिस्थिती आहे. अशा अनेक कारणांमुळे शेतकर्यांना आता शेती करण्याची इच्छाशक्ती राहिलेली दिसत नाही.

COMMENTS