अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅप…लिपिकाला पैसे घेताना पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅप…लिपिकाला पैसे घेताना पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार .4 जुलै रोजी भूसंपादन विभागातील एका लिपिक-महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चा

राहता बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद
कॅन्टोन्मेंटकडून स्थानिक वाहनांच्या टोल वसुलीने नाराजी
संगमनेरमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार .4 जुलै रोजी भूसंपादन विभागातील एका लिपिक-महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या वास्तूत लाच स्वीकारताना पकडण्याची ही पहिलीच घटना आहे. मंगेश विजय ढुमणे (वय 41, राहणार सिव्हील हडको, अहमदनगर) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.

सोमवार चार जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील बी विंगमध्ये घडली. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. यावेळी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी सहसापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, महिला पोलिस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार हरून शेख, राहुल डोळसे या पथकाने पैसे घेणार्‍या लिपिकाला पकडण्याची कारवाई केली.संबंधित कर्मचार्‍याने एक जुलै रोजी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील तक्रारदारांनी त्यांच्या गावामध्ये आईचे नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषक परवानगी करीता ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता भूसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते. तसेच पारनेर तालुक्यातील निघोज गावातील मित्राचे सुद्धा अकृषक परवानगी करीता ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता प्रकरण दाखल केले होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मित्राकडे संबंधिताने लाचेची मागणी केली. त्यांनी त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिली. त्यानंतर दि. 1 जुलै रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणीदरम्यान आरोपी ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते. त्यानुसार सोमवारी पैसे देण्याचे ठरले व मग सापळा लावण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या समोरील मोकळ्या व्हरांड्यात आरोपीस तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

COMMENTS