Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण;अपमान आणि धमक्यांमुळे गळफास घेऊन आत्महत्या

बीड : तालुक्यातील मांजरसुंबा येथील 23 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर कोकाटे याने प्रेमप्रकरणातून झालेल्या मारहाणी व मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्मह

अतिक्रमणधारक विकास समितीच्या बीड शहराध्यक्षपदी उषा मंडलिक यांची निवड
एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
लोकनेते विनायकराव मेटे यांना जयंतीनिमित्त सामुदायिक अभिवादन संपन्नजयंतीनिमित्त डॉ.ज्योती मेटे यांचा मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करण्याचा समाजसेवेचा प्रेरणादायी संकल्प

बीड : तालुक्यातील मांजरसुंबा येथील 23 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर कोकाटे याने प्रेमप्रकरणातून झालेल्या मारहाणी व मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कोकाटे याचे शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मानसिक तणावाखाली गेलेल्या ज्ञानेश्वरने धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले, तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असा गंभीर उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृत तरुणाच्या आई कौशल्या कोकाटे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, माझ्या मुलाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओही काढण्यात आला. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS