Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील-अ‍ॅड.मानकर

बीड : राज्यभरात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर त्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सभेचे प्रदेश

बीड शहरातील नागसेन बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा 13 एप्रिल रोजी
तुलसी फॅशन डिझाईन कॉलेजमध्ये वन महोत्सव सप्ताह उत्साहात साजरा
माणसाने नको ती व्यसने करण्यापेक्षा भजनाचे व्यसन लावावे-अक्षय महाराज पिंगळे

बीड : राज्यभरात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर त्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मानकर यांनी दिली. ते बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, महिला आघाडीच्या ड. प्रज्ञा खोसरे, मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई कल्याण, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बंडू (भाऊ) जटाळ, सरचिटणीस किसनराव डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ड. मानकर म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात अनेक दैनंदिन अडचणी असून त्या सोडवण्यासाठी अभ्यासपूर्वक उपाययोजना राबवण्यात येतील. शेतमालाला हमीभाव मिळणे आणि पीक विम्याचा लाभ वेळेवर मिळणे अत्यावश्यक असून यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात स्थैर्य आणि आनंद निर्माण होईल. वाढत्या आत्महत्या ही गंभीर बाब असून त्या रोखण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजिंक्य आनेराव यांनी मानले. यावेळी बीड तालुकाध्यक्ष म्हणून माऊली गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
लवकरच कार्यकारणी जाहीर – जटाळ
राष्ट्रवादी किसान सभेची जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बंडू (भाऊ) जटाळ यांनी दिली. सर्व तालुक्यांमध्ये तालुकाध्यक्ष नेमून संघटना मजबूत केली जाईल. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS