Homeताज्या बातम्या

दक्षिण मुंबई विभागातील ‘या’ ६ अनधिकृत शाळा आणि अनधिकृत वर्ग तात्काळ बंद करण्याचे शिक्षण निरीक्षकांचे निर्देश

मुंबई : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा आणि शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या चालविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधित शाळांना

मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये
खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग
दक्षिण मुंबईत सरकारच्या परवानगीविना इंग्रजी शाळा सुरू, अनधिकृत वर्ग बंद  होणार; शालेय शिक्षण विभागाची कारवाई | Saamana (सामना)

मुंबई : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा आणि शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या चालविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, हे अनधिकृत शाळा व वर्ग तात्काळ बंद करण्याचे निर्देश दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. एकही वर्गाला मान्यता नसलेल्या मुंबईतील पूर्णतः अनधिकृत शाळांमध्ये खालील शाळांचा समावेश आहे:

१. मदनी हायस्कूल (क्रॉफर्ड मार्केट, मशीद)

२. युसूफ मेहर अली हायस्कूल (नारायण तावडे चौक, तुळशीवाडी, ताडदेव)

३. मदर तेरेसा हायस्कूल (ब्लॉक नं. ११, ९० फूट रोड, धारावी)

४. गणेश विद्यामंदिर (संत कक्कय्या मार्ग, धारावी)

५. ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल (बलराम बाबू खाडेकर मार्ग, वडाळा पूर्व)

६. फिनलंड इंटरनॅशनल स्कूल (माहेश्वरी निकेतन, गोपाळराव देशमुख मार्ग)

मान्यता नसलेले अनधिकृत वर्ग चालवणाऱ्या शाळा: काही अधिकृत शाळांमध्ये ठराविक वर्ग बेकायदेशीरपणे चालवले जात आहेत. यामध्ये मोहम्मदिया हायस्कूल (२७, मशीद मार्ग) येथील इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग अनधिकृत आहेत; या शाळेला केवळ इयत्ता १ ली ते ५ वी आणि ९ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गांचीच मान्यता आहे. तसेच, गोल्डन स्पायरल हायस्कूल, परळ (४ बी, डव्हान्स्ड हाऊस, ताडदेव) या शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग अनधिकृतपणे सुरू आहेत; येथे केवळ इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या वर्गांनाच मान्यता असल्याचे शिक्षण निरीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

COMMENTS