Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत हॉटेलमधील तरुण कामगाराचा मृत्यू

शिर्डी : येथील एका हॉटेलमध्ये  बावीस वर्षीय कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (रा. गणेशनगर, ता. राहाता) असे आह

भगवान महावीरांचा ‘जगा आणि जगू द्या’ संदेश आचरणात आणावा : नगराध्यक्ष गाडेकर
संजीवनी फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना नोकरी 
शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.

शिर्डी : येथील एका हॉटेलमध्ये  बावीस वर्षीय कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (रा. गणेशनगर, ता. राहाता) असे आहे. हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार संशय निर्माण झाल्यानंतर शिर्डी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन राहता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याबाबत नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (रा. गणेशनगर, ता. राहाता) असे असून, मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

COMMENTS