Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काकडे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

शेवगाव : निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथील संगणक विभागाच्या वतीने “एआय तंत्रज्ञान पद्धतीने शेती” या विषयावर आधारित शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे घेण्यात आली. या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी केली जाते याची प्रत्यक्ष माहिती देणे हा होता. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ड्रिप इरिगेशन, सेन्सर आधारित सिंचन प्रणाली, स्मार्ट शेती तंत्रज्ञान, तसेच एआय तंत्रज्ञानच्या साहाय्याने पिकांचे निरीक्षण या बाबींचा अभ्यास केला.  कृषी तज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांचा वापर करून शेती उत्पादनात वाढ कशी करता येते, तसेच पाण्याचा व खतांचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध तंत्रज्ञान समजून घेतले.  या सहलीमुळे विद्यार्थ्यांना शेती व तंत्रज्ञान यांचा संगम अनुभवता आला असून, त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे. हा उपक्रम संगणक विभागातील प्राध्यापक कराळे, सातपुते, घोडके, वावरे, भांबरे व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांनी अशा उपयुक्त शैक्षणिक सहली भविष्यातही आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक
आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास
एकनाथ वाडी-पाथर्डी बस सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी ; आंदोलनाचा इशारा

शेवगाव : निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथील संगणक विभागाच्या वतीने “एआय तंत्रज्ञान पद्धतीने शेती” या विषयावर आधारित शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे घेण्यात आली.

या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी केली जाते याची प्रत्यक्ष माहिती देणे हा होता. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ड्रिप इरिगेशन, सेन्सर आधारित सिंचन प्रणाली, स्मार्ट शेती तंत्रज्ञान, तसेच एआय तंत्रज्ञानच्या साहाय्याने पिकांचे निरीक्षण या बाबींचा अभ्यास केला.

 कृषी तज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांचा वापर करून शेती उत्पादनात वाढ कशी करता येते, तसेच पाण्याचा व खतांचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध तंत्रज्ञान समजून घेतले.

 या सहलीमुळे विद्यार्थ्यांना शेती व तंत्रज्ञान यांचा संगम अनुभवता आला असून, त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे. हा उपक्रम संगणक विभागातील प्राध्यापक कराळे, सातपुते, घोडके, वावरे, भांबरे व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांनी अशा उपयुक्त शैक्षणिक सहली भविष्यातही आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS