Homeक्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरकोहली-बुमराह पुनरागमन, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले

मुंबई : इंग्लंडविरुद्ध पुढील महिन्यात होणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय भारतीय संघाची घ

 कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू
आयपीएल 2027 लवकरच सुरू होण्याची शक्यता
सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; 'या'  खेळाडूचे 3 वर्षानंतर कमबॅक - Dainik Prabhat

मुंबई : इंग्लंडविरुद्ध पुढील महिन्यात होणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले असून निवड समितीच्या काही निर्णयांनी क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.संघ घोषणेनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघात स्थान न मिळणे. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने नाबाद 110 धावांची दमदार खेळी साकारत शतक झळकावले होते. मात्र, वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले आहे. विराट कोहलीचे पुनरागमन भारतीय संघासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. तथापि, त्याची निवड अंतिम तंदुरुस्ती चाचणीच्या अधीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तंदुरुस्तीची परवानगी मिळाल्यानंतरच त्याला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, 2023 च्या विश्‍वचषक अंतिम सामन्यानंतर प्रथमच जसप्रीत बुमराह एकदिवसीय संघात परतला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळ मिळणार आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. संघ निवडीत काही युवा खेळाडूंना संधी मिळाली नसल्याचे दिसून आले. यशस्वी जैस्वालसह प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांना या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आगामी काळात संघातील स्पर्धा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार.

वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे बाहेर

भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला असून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या आगामी आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात 26 व 28 जून रोजी दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक

1 जुलै – पहिला टी-20 सामना

4 जुलै – दुसरा टी-20 सामना

7 जुलै – तिसरा टी-20 सामना

9 जुलै – चौथा टी-20 सामना

11 जुलै – पाचवा टी-20 सामना

14 जुलै – पहिला एकदिवसीय सामना

16 जुलै – दुसरा एकदिवसीय सामना

19 जुलै – तिसरा एकदिवसीय सामना

COMMENTS