Homeताज्या बातम्यादेश

रस्ते अपघातात 12 टक्क्यांनी वाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गाच्या अहवालातून दावा

नवी दिल्ली : देशामध्ये होणार्‍या अपघातांची संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, अपघात रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान उभे राहतांना दिसून येत आहे.

सामंथाला उचलून घेत ‘खिलाडी’ अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री.
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांची भूमिका भलतीच!
पक्ष आणि धनुष्यबाणावरच शिंदे गटाचा दावा ?

नवी दिल्ली : देशामध्ये होणार्‍या अपघातांची संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, अपघात रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान उभे राहतांना दिसून येत आहे. कारण अपघातातून मृत्यू होणार्‍यांची संख्या मोठी आहे. यासंदर्भातील नुकताच एक अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केला असून, यात भारतामध्ये अपघातामध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे.
या अहवालामध्ये गेल्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये 1,68,491 लोकांचा मृत्यू झाला. तर  4,43,366 लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात 11.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृतांमध्ये 9.4 टक्के आणि जखमींच्या संख्येत 15.3 टक्के वाढ झाली आहे. रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण ओव्हरस्पीडिंग असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातात वर्षानुवर्षे वाढ होत आहे. हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे आहे. बाईक चालवताना झालेल्या अपघातात 35,692 लोकांचा मृत्यू झाला. तर 14, 337लोक हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसल्याने मरण पावले. आकडेवारीनुसार, सीट बेल्ट न बांधलेल्या 16,715 लोकांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी 8300 लोक कार चालवत होते, तर 8331 लोक कारमधून प्रवास करत होते.

COMMENTS