Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू साखर कारखाना कर्मचार्‍यांना 19.50 टक्के दिवाळी बोनस

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचार्‍यांना यावर्षीचा 19.50 टक्के दिवाळी बोनस देत आहोत. ही एकूण रक्कम 10

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा
साहेब टाळा कधी उघडणार …?
ध्वजारोहणास विरोध करणार्‍या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचार्‍यांना यावर्षीचा 19.50 टक्के दिवाळी बोनस देत आहोत. ही एकूण रक्कम 10 कोटी 71 लाख 96 हजार इतकी होते, अशी माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी दिली. यावेळी साखर कारखान्यातील कामगारांनी आपला आनंदोत्सव साजरा करून कामगार युनियनच्या वतीने प्रतिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांच्याशी चर्चा करून संचालक मंडळाच्या मान्यतेने 19.50 टक्के दिवाळी बोनसचा देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चिफ अकौंटंट संतोष खटावकर, एचआर मॅनेंजर अनिल पाटील, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

COMMENTS