Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभेचा समारोप

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगांव तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा नुकतीच तालुका क्रीडा संकुलात अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष गाडे
गणेशोत्सवासाठी कोपरगाव पोलिसांनी घेतली शांतता समितीची बैठक
पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी ; विजयी प्रदीप परदेशींनी शिवसेनेच्या तिवारींना चारली धूळ

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगांव तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा नुकतीच तालुका क्रीडा संकुलात अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे व गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या सभेला छत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके, क्रीडा संकुल प्रमुख राजेंद्र पाटणकर, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक विठ्ठल होन, धनंजय देवकर,प्रा.दत्ता देवकर, निलक,समिती अध्यक्ष नितीन निकम, उपाध्यक्ष शिवराज पाळणे, नारायण शेळके, सचिव अनुप गिरमे, सहसचिव आकाश लकारे, नितीन सोळके, जिल्हा संपर्कप्रमुख शिवप्रसाद घोडके, रमेश येवले, संजय अमोलिक, निलेश बडजाते आदीसह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या उपस्थित संपन्न झाली.याप्रसंगी जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी सांगितले की, जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून शासकीय क्रीडा स्पर्धेसाठी अग्रीम निधी मिळावा. कारण स्पर्धा घेतलेल्या शाळा, महाविद्यालय यांच्या क्रीडा शिक्षकांना संस्थेचे अनेक नियम बंधन असल्याने निधी विलंबामुळे खुप त्रास होतो. परिणामी चांगल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी न्याय मिळत नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाने सहकार्य करावे. अशी मागणी चंद्रे यांनी केली.
 गटशिक्षणाधिकारी  शेख म्हणाल्या की,सर्व क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडाव्या. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करत जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये यांनी मैदानी खेळात खेळाडूंचा सहभाग वाढवायला हवा. कारण सध्याच्या परिस्थितीत मोबाइलच्या अतिवापराने विद्यार्थी मैदानी खेळ विसरत चाललेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मैदानी खेळात सहभाग वाढवावा. क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम यांनी सांगितले की, मंगळवार 29 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतांना खेळावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक दिलीप घोडके, विठ्ठल होन, राजेंद्र पाटणकर यांनी देखील मार्गदर्शन केले. सदर सभेचे सूत्रसंचालन जिल्हा संपर्क प्रमुख शिवप्रसाद घोडके यांनी केले. तर आभार सचिव अनुप गिरमे यांनी मानले.

COMMENTS