Homeताज्या बातम्या

दुरगाव येथे महिलेस मारहाण

कर्जत : तालुक्यातील दुरगाव येथील मुस्लीम वस्तीमध्ये सावत्र आईला मुलांसह कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून जंगलात नेऊन सोडल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ; आरोग्य विभाग आणि एसबीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १२.७५ लाखांची फसवणूक
प्रियकराने केला अल्पवयीन मुलीचा खून; पुरावा नष्ट करण्यात मदत करणाऱ्या वडिलांसह मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई
श्रीरामपुरातील ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणात चेअरमन सुरेश कुटेसह १० संचालकांना अटक; १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्जत : तालुक्यातील दुरगाव येथील मुस्लीम वस्तीमध्ये सावत्र आईला मुलांसह कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून जंगलात नेऊन सोडल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेल्या साफिया रशीद शेख यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार त्यांनी व त्यांचे पती रशीद जानू शेख यांनी केली आहे.
साफिया शेख आणि रशीद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावत्र आई असल्याच्या कारणावरून तसेच रशीद शेख यांनी त्यांच्याशी विवाह केल्याचा राग मनात धरून मुलांसह इतर नातेवाईकांकडून सातत्याने त्रास दिला जात होता. याबाबत सोमवारी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
त्यानंतर मंगळवारी सकाळी साफिया शेख या घरात नमाज पठण करत असताना दाऊद रशीद शेख, हकीम रशीद शेख, निलू दाऊद शेख, करिष्मा हकीम शेख, जानू सुलतान शेख आणि म्हैतबी जानू शेख यांनी घरात प्रवेश करून शिवीगाळ व दमदाटी करत काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर संबंधितांनी साफिया शेख यांचे हात-पाय बांधून वाहनातून जंगल परिसरात नेऊन सोडले. पुन्हा घरी आल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जंगल परिसरात गुरे चारणाऱ्या दोन मुलांनी त्यांची सुटका केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी रशीद शेख यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, जखमी महिलेवर उपचार सुरू असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच घर, जमीन, दुचाकी, धान्य आणि रोख रक्कमही संबंधितांनी ताब्यात घेतल्याचा आरोप शेख दाम्पत्याने केला आहे. पत्रकारांशी बोलताना दोघांनीही अश्रूंना वाट मोकळी करून देत न्यायाची मागणी केली.

COMMENTS