Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्षाच्या (अजितदादा गट)  त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष पदी बंडू खोडे 

त्र्यम्बकेश्वर प्रतिनिधी - नाशिक येथे झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित दादा गट ) बैठकीत काही महत्वाच्या घडामोडी होत असतांना जवळच येत असलेल्या

सावेडीत सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
मार्वे बीचवर बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले
केजरीवाल आणि के. कविता यांच्या कोठडीत 7 मेपर्यंत वाढ

त्र्यम्बकेश्वर प्रतिनिधी – नाशिक येथे झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित दादा गट ) बैठकीत काही महत्वाच्या घडामोडी होत असतांना जवळच येत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यम्बकेश्वर तालुका हा लोकसभेसाठी महत्वाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे ( अजित दादा गट) जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने यांनी पात्रकांवये त्र्यम्बकेश्वर येथील युवा कार्यकर्ते बंडू बाबुराव खोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पक्षाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहेत. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.श्री. अजितदादा पवार साहेब, ना.श्री. छगनरावजी भुजबळ साहेब व प्रदेश अध्यक्ष  खा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे व शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता बंडू खोडे यांची जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने यांनी नियुक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रसंगी बंडू खोडे यांची नियुक्ती झाल्यावर खोडे समर्थकांनी खोडे यांचे त्र्यम्बकेश्वर नगरीत जल्लोषात स्वागत करत आनंद व्यक्त केला.

COMMENTS