Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकी तालुका संघाच्या संस्थापक सदस्यांना न्याय मिळवून देणार – देविदास पिंगळे 

म्हसरूळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व ग्रामस्थांनी केला सत्कार सोहळा

पंचवटी -  नाशिक शेतकी तालुका संघाच्या स्थापनेवेळी ज्या संस्थापक सदस्यांनी पंचवीस रुपये प्रत्येकी वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली. त्

अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.
उसने पैसे मागितले म्हणून शिक्षिकेला जिवंत जाळलं.
डेल्टा प्रकाराविरूद्ध कोविशिल्ड परिणामकारक

पंचवटी –  नाशिक शेतकी तालुका संघाच्या स्थापनेवेळी ज्या संस्थापक सदस्यांनी पंचवीस रुपये प्रत्येकी वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली. त्या सदस्यांना निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक मंडळ पुन्हा जिवंत करणार आणि त्यांना आजीव सदस्यत्व देऊन मतदान पात्र करणार असे प्रतिपादन माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. ते म्हसरूळ विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

नाशिक शेतकी तालुका संघाचे विजयी झालेले उमेदवार दिलीपराव थेटे,शरद गायखे, बबन कांगणे ,रावसाहेब कोशिरे,दिलीप चव्हाण,विष्णू थेटे ,भिकाजी कांडेकर,शांताराम माळोदे,दीपक हगवणे, आशा गायकर, जयराम ढिकले, वाळू  काकड, ढवळू फसाळे आणि नाशिक जिल्हा कांदा बटाटा सह. संघ राजाराम घनवटे , रमेश घुगे, रमेश पिंगळे, निवृत्ती महाले, संजय पवार, मुन्ना कोकाटे, चंद्रकांत कोशिरे, रत्नाकर चुंभळे, बापूसाहेब कुंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक युवराज कोठूळे, राजाराम धनवटे, विलास कड, माजी संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार,आणि  सेंट्रल गोदावरीचे संचालक तानाजी पिंगळे, आबासाहेब बर्डे, विलास कड, विलास कांडेकर ,भास्कर गोडसे शंकरराव पिंगळे, काळू थेटे, प्रशांत  निवृत्ती कांडेकर किसन कांडेकर गोकुळ काकड, गणेश कहांडळ, दौलत पाटील, भाऊसाहेब भावले,धनाजी पेखळे, नामदेव गायकर  उपस्थित होते. 

पुढे माजी खासदार तथा सभापती देविदास पिंगळे म्हणाले की, जनतेने नाशिक शेतकी तालुका संघाच्या निवडणूकीत सतरा पैकी तेरा  जागा निवडून दिल्या. सहकार क्षेत्रात संस्था टिकवणे काळाची गरज आहे. यामुळेच नाशिक तालुक्यातील शेतकरी सभासद विश्वास दर्शविला आहे, आपण सर्वांनी हा सार्थ ठरवत शेतकरी हिताचे काम करावे.

प्रास्ताविकात काँगेसचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक वसंतराव मोराडे म्हणाले की, सहकार क्षेत्रात राजकीय वाटचालीस म्हसरूळ सदैव आपल्या पाठीशी असते व राहील. मात्र, पुढील कार्यकाळात युवांना संधी द्यावी अशी मागणी केली.तसेच निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पद्माकर मोराडे यांनी केले तर विनायक सुर्यवंशी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी म्हसरूळ  विविध कार्यकारी सहकारी  सोसायटी व ग्रामस्थ यांनी परिश्रम केले.

“माजी सभापती तथा नगरसेवक गणेश गितेचा सत्कार”– नुकत्याच नामको बँकेच्या निवडणूकीत प्रगती पॅनल विजय झाला. यात गणेश गीते यांची संचालक पदी निवड झाली म्हसरूळ तथा प्रभाग क्रमांक एकचा मान उचाविला याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच सामजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी पद्माकर मोराडे यांना कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तर सामजिक कार्यकर्ते राजू थोरात यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीण (दक्षिण) जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली याबद्दल सत्कार करण्यात आला.

COMMENTS