Homeताज्या बातम्याक्रीडा

कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल

दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती
इस्लामपूरच्या राजश्री पाटील हिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ’किली मांजारो’ शिखरावर फडकविला तिरंगा
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय

दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद शमी जखमी असून त्याच्या जागी बीसीसीयआने आवेश खानला संधी दिली आहे. केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे 9 जानेवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 0-1 ने आघाडीवर आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानची निवड केली आहे. 

कसा असेल भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह  प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (वि.), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान

COMMENTS