Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण तालुक्यात वाघाटी मांजराचा वावर; मादीसह तीन पिल्लांचे दर्शन

फलटण /प्रतिनिधी : फलटण मौजे खटकेवस्ती (गवळी नगर) येथील आनंदराव खोमणे यांच्या शेतातील ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजुरांना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट

सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी वेतनापासून वंचित
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा
Osmanabad : खुनाच्या आरोपातील आरोपीचा भूम तालुक्यात खून (Video)

फलटण /प्रतिनिधी : फलटण मौजे खटकेवस्ती (गवळी नगर) येथील आनंदराव खोमणे यांच्या शेतातील ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजुरांना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) या अती दुर्मीळ जंगली मांजर या वन्य प्राण्याची तीन पिल्ले आढळून आली होती. खोमणे यांनी तात्काळ याची माहिती फलटण वनविभागाला दिली. त्यानूसार सातारा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक सातारा महेश झांजूर्णे, फलटण तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र कुंभार, वनरक्षक राहुल निकम तसेच ग्लोबल अर्थ फाऊंडेशनचे प्राणीमित्र सचिन जाधव, मंगेश कर्वे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ती पिल्ले वाघाटी या दुर्मिळ रानमांजराची असल्याची खात्री करून ताब्यात घेऊन ती पिल्ले ज्या ठिकाणी सापडली त्या जागेची पाहणी करून त्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. या कामी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणेचे सदस्य श्रेयश कांबळे, ऋषिकेश मोरे यांची मदत घेण्यात आली.
साधारण सायंकाळी सहाच्या सुमारास या टीमने ज्या ठिकाणी पिल्ले सापडली त्याच जागी ती एका लहानशा प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले. यानंतर साधारण एका-एका तासाच्या अंतराने येऊन त्या पिल्लांची आई त्यांना पुन्हा घेऊन गेली. अखेर वाघाटी मांजर आणि तिच्या पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. फलटण तालुक्यात असे दुर्मिळ वन्यजीव सापडणे हि पहिलीच घटना नसल्याने फलटण तालुका हा वन्यजीव संपदेने समृध्द आणि संपन्न असल्याचे मत फलटण तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी यावेळी व्यक्त केले.
याकामी विराज गावडे, राधेश्याम जाधव, बजरंग खोमणे, आनंदराव खोमणे या गावकर्‍यांची मोलाची मदत झाली.
वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) (प्रिओनाइलुरस रुबिगिनोसस) ही मांजर कुटुंबातील सर्वात लहान सदस्यांपैकी एक आहे. ज्यातील ऐतिहासिक नोंदी फक्त भारत आणि श्रीलंकेतील आहेत. सन 2016 पासून, जागतिक वन्य लोकसंख्या खणउछ रेड लिस्टवर आहे.

वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. वाघाटी मांजर हे अती दुर्मीळ असल्याने हि प्रजाती वाचवणे गरजेचे आहे.
सचिन जाधव (ग्लोबल अर्थ फाऊंडेशन)

COMMENTS