एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात! पण का?

Homeताज्या बातम्यादेश

एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात! पण का?

तपासी यंत्रणांनी निष्पक्ष असावे अशी अपेक्षा बाळगणे गैर नक्कीच नाही.किंबहूना आपल्या लोकशाहीची तपास यंत्रणांकडून हीच अपेक्षा आहे.अशी निष्पक्षता जपण्यास

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील – राज्यपाल कोश्यारी
लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी
संजय राऊतांनी चाटूगिरी आणि चोंबडेपणा थांबवावा  

तपासी यंत्रणांनी निष्पक्ष असावे अशी अपेक्षा बाळगणे गैर नक्कीच नाही.किंबहूना आपल्या लोकशाहीची तपास यंत्रणांकडून हीच अपेक्षा आहे.अशी निष्पक्षता जपण्यासाठी  कोणत्याही चौकशीमध्ये विश्वासार्हता आणि सत्यनिष्ठा सिध्द करण्याचे कसब दाखवावे लागते,आणि म्हणूनच 

“खासगी हेर आणि राजकीय संबंध असलेल्या लोकांच्या उपस्थितीत झालेला तपास संशयाचे गडद ढग तयार करतो.आर्यन खान प्रकरणात एनसीबीवर होत असलेले आरोप अशाच तपास शैलीमुळे चर्चेत आले आहेत.लिड

कुठल्याही तपास यंत्रणेकडे खबऱ्यांची एक स्वतंत्र यंत्रणा असते.समाजात घडत असलेल्या अनेक बेकायदेशीर घटनांचा माग काढून  मिळालेली गुप्त माहीती हे खबरे तपास यंत्रणांना देतात,त्या माहीतीच्या आधारे स्थानिक पोलीस अथवा राष्ट्रीय तपास यंत्रणा आपले कर्तव्य पार पाडीत असतात.अशाच प्रकारची भुमिका बजावणारे मनिष भानूशाली आणि के.पी.गोसावी ही दोन नावे सध्या देशभर चर्चेत आहेत.एक जबाबदार नागरिक म्हणून या प्रकरणाची माहिती त्यांनी  एनसीबीला दिली होती.खरेतर अशा माहीतीचे स्वागत व्हायला हवे.तसे स्वागत एनसीबी आणि भाजपाचा अपवाद सोडला तर कुणीही करतांना दिसत नाही.उलट राज्याचे एकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी या दोन नावांचा संदर्भ देत एनसीबीलाच आरोपीच्या उभे केले आहे.अर्थात एनसीबीने मलिक यांचे हे सारे आरोप फेटाळले असले तरी ही वेळ का आली याचाही विचार तपास यंत्रणांनी करायला हवा.

एखादा हेर किंवा राजकीय कार्यकर्ता तुम्हाला माहिती देत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत व्हायला हवं. मात्र, अशा लोकांना कधीही तपासात सहभागी करता कामा नये. हितसबंध असलेल्या किंवा काही स्वार्थ असलेल्यांशी तुम्ही संलग्न असाल तर तपास निःपक्षपणे आणि कायदेशीर पद्धतीनं होईल, यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही,हे नैसर्गीक न्यायाशी संबंधीत असलेले मुळ  तत्व एनसीबी या प्रकरणात विसरली.याशिवाय एखाद्या हाय प्रोफाईल सेलिब्रिटी केसमध्ये तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या व्यक्तीबरोबर सेल्फी घेऊन ती सोशल मीडियावर पोस्ट करणं किंवा छापा टाकल्यानंतर राजकीय कार्यकर्ता सेलिब्रिटी आरोपीला घेऊन येताना दिसणं, असे प्रकार शक्यतो घडत नाहीत.बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एका क्रूझवर झालेल्या तथाकथित रेव्ह पार्टीत अटक केल्यानंतर, असंच काहीसं घडलं. त्यामुळंच अंमली पदार्थांची तस्करी रोखणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या संस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.मुळात अलिकडच्या काळात केंद्रीय आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीतील तपास यंत्रणांवर पक्षपातीपणाचे आरोप वारंवार होऊ लागले आहेत.भाजप सरकार सत्तेवर येण्यापुर्वी तपास यंत्रणांकडून अशा प्रकारचा राजकीय पक्षपात होत नव्हता ,असेही नाही,तथापी नैतिकतेची चाड बाळगली जात होती.किंबहूना नैतिकता सोडली गेली तरी माध्यमे त्या काळात एव्हढ्या प्रगतीपथावर नव्हती म्हणून आजच्या इतकी वाच्यता होत नव्हती असे म्हणणे अधिक इष्ट ठरेल.कारण काहीही असो,अलिकडच्या सात वर्षात तपास यंत्रणांचा राजकीय पक्षपात हा चर्चेत येऊन कळीचा मुद्दा बनला हे मात्र नक्की.घरधन्याने घर आणि शेताची राखण करण्यासाठी पाळलेल्या श्वानाइतका प्रामाणिकपणा इथेही नजरेत भरू लागल्याने तपास यंत्रणांवर आरोपांची चिखलफेक होऊ लागली आहे.एनसीबीही यातून सुटू शकत नाही असाच हा सारा घटनाक्रम देशासमोर आहे.

आर्यन खानचा अटकेनंतरचा जो फोटो व्हायरल झाला, तो केपी गोसावी नावाच्या व्यक्तीनं काढला होता, असा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. गोसावी हे खासगी गुप्तहेर असून त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

गोसावी यांनी एनसीबीच्या ताब्यात असेलल्या आर्यन खानबरोबर घेतलेला सेल्फी व्हायरल झाल्यानंतर, एनसीबीनं या व्यक्तीशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं,तथापी  ते साक्षीदार असल्याचं नंतर स्पष्ट होणे आणि एनसीबीनेही त्याला दुजोरा देणे या गोष्टी संशय वाढविणाऱ्या आहेत.

या प्रकरणाशी संबधित दुसऱ्या  एका व्हीडिओत  आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटबरोबर दिसत आहे, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मनीष भानुशाली सोबत असल्याचा आरोपही मलिक यांनी केलाय. त्यांच्या फेसबूक प्रोफाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांबरोबरचे फोटोही आहेत.

या व्हीडिओमध्ये भानुशाली मर्चंटचा हात पकडून त्यांना घेऊन जाताना दिसत आहेत.

या आरोपांच्या आधारे नवाब मलिक यांनी आर्यन खानच्या अटकेशी संबंधित संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचं म्हटलं आहे. हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी भाजपचं कारस्थान असल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे.

आर्यन खान प्रकरणाचा संबंध गुजरात मधील मुंद्रा बेटावरील क्रूझवर टाकण्यात आलेला छाप्याशीही जोडला जात आहे,या छाप्यात नऊ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.त्या छाप्याचे पुढे काय झाले याविषयी कुठेही चर्चा होताना दिसत नाही  गुजरातच्या मुंद्रा बेटावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा सारा प्रपंच  मांडला गेल्याची चर्चा यातून सुरू झाली आहे.ड्रग्ज व्यवसायातील या मोठ्या माशांना सोडून लहान-लहान प्रकरणावर एनसीबी लक्ष केंद्रीत करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.एकूणच हे सारे आरोप फेटाळून मलिक यांच्या जावयावर नोव्हेंबर २०२० मध्ये एनसीबी केलेल्या कारवाईमुळे अस्वस्थ झाल्याने मलिक एनसीबीला लक्ष्य करीत असल्याचा प्रतिवाद एनसीबी करीत असले तरी उपस्थित झालेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आलेले अपयश एनसीबी कसे झाकणार? हा खरा प्रश्न आहे.

COMMENTS