Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघीडीच्या कार्यकर्त्यांनी तिरडी मोर्चा काढून केले राज्यपालांच्या पुतळ्याचे दहन 

कोल्हापूर प्रतिनिधी- शिवछत्रपतींच्या  पराक्रमाने पावण असलेल्या व भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्ये पत्करलेल्या गारगोटी भुमित, गारगोटी शहरात

केज रोटरीच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर सचिव अरुण नगरे
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा 10 वर्षांनी निकाल
ट्रान्सजेंडर कपलने दिली गुडन्यूज

कोल्हापूर प्रतिनिधी– शिवछत्रपतींच्या  पराक्रमाने पावण असलेल्या व भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्ये पत्करलेल्या गारगोटी भुमित, गारगोटी शहरातील  क्रांति ज्योतीला स्मरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यींच्या वतीने, आज दुपारी १२ वा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा तिरडी मोर्चा काढला व क्रांती ज्योती समोर त्यांच्या पुतळ्याला  चप्पलाने मारत दहन केले. राज्यपाल कोशारींनी  शिवछत्रपतींचा अपशब्द वापरून अवमान केला.त्या अवमानाचा बदला घेण्यासाठी आज या तिरडी च्या निषेध मोर्च्याचे आयोजन केले. या कारणाने या गारगोटी शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, बंदला ऊत्स्फुर्तपणे पाठींबा दर्शवला. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भाजपा व त्यांच्या मित्रपक्षावर टिकेचा घनाघात चढविला. राज्यपाल कळसुत्री बाहुले असून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत असल्याचे ते म्हणाले अशा राज्यपालाला त्वरीत हटवण्याची त्यांनी मागणी केली. कॉम्रेड सम्राट  मोरे यांनी राज्यपाल कोशारी हे वाचाळवीर असून त्यांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आंम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. डॉ.राजीव चव्हाण यांनी कोशारीचा निषेध करत भाजपच्या आरएसएस संघटनेचाही समाचार घेतला. कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष  शामराव देसाई यांनीही या सरकारला जाग नाही.राज्यपाल कोश्यारींना  समुद्रात फेकूया कोषारीला हलवल्यशिवाय आंम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंडितराव केणे, भुदरगड प्रहार चे अध्यक्ष मच्छिद्र मुगडे यांनीही तिख शब्दात कोशीरींचा निशेष केला. या मोर्चास तालूक्यातून अनेक विरोधी पक्षांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष बीळ देसाई , राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी,शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, आदि सहभागी झाले होते. चोख पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा दहन प्रक्रीया व त्यानंतर या निषेध मोर्चाची सांगता झाली सभा झाली.

COMMENTS