Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प

अवकाळीचा तडाखा !
विकासाची गुढी अशीच उंच उंच होत राहो! नागपूरच्या भव्य शोभायात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांचा सहभाग
बळीराजा संकटात! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

COMMENTS