Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान अव्वल

इस्लामाबाद : जगातील दहशतवादाचे स्वरूप आणि भौगोलिक केंद्र सतत बदलत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नव्या अहवालानुसार दहशतवादाच्या फटक्याने स

लोकशाहीतील सोयीचे राजकारण
अस्मानी संकट
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावात दारूबंदी करावी

इस्लामाबाद : जगातील दहशतवादाचे स्वरूप आणि भौगोलिक केंद्र सतत बदलत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नव्या अहवालानुसार दहशतवादाच्या फटक्याने सर्वाधिक ग्रासलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानने पहिला क्रमांक मिळवला असून, यापूर्वी अव्वल असलेला बुर्किना फासो दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. नायजर तिसर्‍या क्रमांकावर आहे.
आर्थिक आणि शांततेवरील संशोधन करणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जागतिक दहशतवाद निर्देशांक अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. या अहवालाच्या मागील बारा आवृत्त्यांमध्ये पाकिस्तानचा सातत्याने पहिल्या दहा देशांमध्ये समावेश राहिला होता. मात्र यंदा प्रथमच तो थेट अव्वल स्थानावर पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. अहवालानुसार, 2025 या वर्षात पाकिस्तानमध्ये एकूण 1,045 दहशतवादी घटना नोंदवण्यात आल्या. या हल्ल्यांमध्ये 1,139 जणांचा मृत्यू झाला, तर 1,595 जण जखमी झाले. गेल्या दशकातील हा सर्वाधिक गंभीर आणि चिंताजनक आकडा मानला जात आहे. या घटनांमुळे देशातील सुरक्षा परिस्थिती ढासळल्याचे चित्र स्पष्ट होते. दहशतवादी कारवायांमध्ये विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेची भूमिका ठळकपणे समोर आली आहे. या संघटनेने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागांचा वापर आश्रयस्थान, प्रशिक्षण केंद्र आणि हल्ल्यांच्या नियोजनासाठी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. येथूनच सुरक्षा दलांवर तसेच सामान्य नागरिकांवर वारंवार हल्ले चढवले गेले. 2025 मध्ये या संघटनेच्या कारवायांमध्ये सुमारे 24 टक्क्यांची वाढ झाली असून, घटनांची संख्या 595 वर पोहोचली, तर मृतांचा आकडा 637 इतका झाला. याशिवाय बलुचिस्तानमधील विभाजनवादी गटांनीही दहशतवाद वाढवण्यात मोठा वाटा उचलला आहे. क्वेटा परिसरात प्रवासी रेल्वेचे अपहरण करून शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याची घटना विशेषतः धक्कादायक ठरली. या प्रकारात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, ज्यामुळे देशातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. भारताची स्थिती तुलनेने सुधारलेली दिसत आहे. दहशतवाद निर्देशांकात भारत 13व्या क्रमांकावर असून दक्षिण आशियात पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननंतर तिसर्‍या स्थानावर आहे.

COMMENTS