Homeताज्या बातम्या

करंजी शाळेस वॉटर प्युरिफायर मशीन भेट

कोपरगाव शहर : आंतरराष्ट्रीय लायन्स, लीनेस व लिओ क्लब कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तथा कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक सत्येन मुंदडा यांच्या भगिनी स्व. शिल्पराणी सुभाष मुंदडा यांच्या स्मरणार्थ मुंदडा परिवारांच्या वतीने करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वॉटर प्युरिफायर  पाणी शुद्धीकरण मशीन भेट म्हणून देण्यात आले.गावचे सरपंच रवींद्र आगवण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. ११ जुलै) लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य मार्गदर्शक माजी नगरसेवक सत्येन मुंदडा, क्लबचे अध्यक्ष सचिन भडकवाडे, माजी अध्यक्ष अक्षय गिरमे, उपसरपंच शिवाजी जाधव, मुख्याध्यापक प्रदीप भाकरे आदींच्या हस्ते लोकार्पण करत शालेय परिसरात पेरू व आंबा या फळझाडांचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी लिनेस क्लबच्या अध्यक्षा सोनाली गिरमे, सचिव शीला राशीनकर, लायन्सचे सचिव दीपक जाधव, खजिनदार किरण शिरोडे, माजी सचिव संदीप राशीनकर, लिओ क्लबचे अध्यक्ष करण शहा, सचिव सम्यक फुलफगर, खजिनदार ओम जाधव, गणेश उदावंत यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, उपाध्यक्ष रघुनाथ कापसे, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुनील देसाई, बळीराम थेटे, वॉटर पुरिफायर टेक्निशियन अनिल दवंगे, बळीराम थेटे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव तथा माजी विद्यार्थी समितीचे उपाध्यक्ष प्रा. विजय कापसे आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लब कोपरगावचे पदाधिकारी सदस्य, शालेय शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय कापसे, स्वागत सरपंच रवींद्र आगवन, आभार उपसरपंच शिवाजी जाधव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदीप भाकरे यांनी केले.

पंचनाम्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवा३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा ; आ. कोल्हेंनी विधानभवनात वेधले लक्ष  
रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
स्वारातीम विद्यापीठात ‘वन महोत्सव’ व ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत 100 वृक्षांचे वृक्षारोपण

COMMENTS