Homeताज्या बातम्यासंपादकीय

अजूनही न्याय बाकी आहे…..!

आमची प्रतीके समतेची, सीता-शंबुक-एकलव्याची, अशी घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत काही वर्षांपूर्वी दुमदुमली होती! ही घोषणा सीता आणि शंबुक या दोन नायकां

……. तर, दर पाचमधील एक माणूस धोक्यात !
अच्छे दिन च्या बिरूदाची भुरळ !
क्रिकेट च्या धुंदीत का गुंतलात ?

आमची प्रतीके समतेची, सीता-शंबुक-एकलव्याची, अशी घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत काही वर्षांपूर्वी दुमदुमली होती! ही घोषणा सीता आणि शंबुक या दोन नायकांना स्त्री आणि शूद्र म्हणून न्याय मिळाला का, याची विचारणा करणारी आणि जर तो तसा मिळाला नसेल तर, त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आमची आहे; अशी या घोषणा देणाऱ्यांची भूमिका होती. सीता आणि शंबुक या दोन्ही नायकांवर अन्याय करणारे स्वतःच भगवान राम आहेत. सीतामाईने ज्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याच सीतामाईवर त्यांनी शंका घेऊन, समतेचे तत्व केवळ नाकारलं नाही; तर, त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचा तो अनादर होता. तर, दुसऱ्या बाजूला भगवान राम यांच्याकडे काही लोक जाऊन म्हटले की, तुमच्या राज्यातील शूद्र हे तपश्चर्या करत असल्यामुळे आमच्या मुलांच्या प्राणांवर बेतली आहे, असं म्हणताच,  भगवान राम यांनी स्वतः जाऊन शंबुकाचा शिरच्छेद केला. रामायणाच्या इतिहासातील अजूनही ज्यांना न्याय दिला गेलेला नाही, त्यांना न्याय मिळावा ही आज भगवान राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने समस्त भारतीयांची अपेक्षा आहे! भगवान राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले असतानाच, चारही शंकराचार्यांनी त्यांना विरोध करून, आजही भगवान राम यांच्या राज्यात शूद्र हे समान पातळीवर नाहीत, याची जाणीव पुन्हा एकदा करून देण्यात आली आहे. मात्र, हा संघर्ष आजच्या काळातही सुरू आहे. रामराज्य ही संकल्पना तशी आम्ही धार्मिक ग्रंथांमध्ये वाचली, पाहिली आहे. नेमकं रामराज्य काय आहे, याची आजही आम्हाला पुरेशी कल्पना येत नाही कारण रामायण काळातील शंबुक हा शूद्र म्हणजे आजचा ओबीसी, आजच्या काळात भारताचे पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी. त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील सहभाग नाकारण्यासाठी वैदिक परंपरांचे वहन करणारे शंकराचार्यांनी टोकाच्या पातळीला जाऊन त्यांना केलेला विरोध, हा रामराज्याचा भाग आहे का? हे देखील आजच्या चारही शंकराचार्यांनी स्पष्ट करायला हवे. भगवान राम यांच्यावर असणारी आमची श्रद्धा ही एवढी अगाध आहे की, आमचे एकमेकांशी संभाषण  राम राम या संबोधनाने सुरू होते. ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या पतीला नावाने न बोलवता आजही माझे राम संबोधतात. पहाटे झोपेतून उठणारा कुठलाही माणूस, हा रामाचे नाव घेऊन झोपेतून जागा होतो. खरं म्हटलं तर भगवान राम हे भारतीय समाजाच्या कणाकणात विसावले असताना शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घेतलेला भूमिकेचे आम्हाला अजूनही आकलन होत नाही. आणि ते आकलन जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला असे वाटत राहील की, सीता आणि शंबुक यांना न्याय मिळणं बाकी आहे. तसा तो न्याय  नाकारण्याची परंपरा आजही अबाधित आहे का? याचा उलगडा होणे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्त भारतीयांना होणे गरजेचे आहे. सृष्टी चे संचलन ज्या कोणत्याही शक्तीच्या द्वारे होत असेल ती शक्ती म्हणजे एक देवता आहे आणि ती देवता राम आहे अशी भारतीयांची श्रद्धा आहे पण कोणतीही श्रद्धा जेव्हा कर्मकांडाचे रूप घेते तेव्हा ती शोषणाची व्यवस्था बनते आणि शोषणाच्या व्यवस्थेला जर राजकीय सत्तेचा आयाम दिला तर ती लोकांच्या हक्क आणि  अधिकार यांनाच केवळ नाकारते, असं नाही. तर, लोकांचे नैसर्गिक हक्क देखील ती व्यवस्था नाकरत असते. त्या दृष्टीने शंबुक, एकलव्य आणि सीता यांना रामायण आणि महाभारतात न्यायाचा हक्क किंवा कोणताही हक्क राहिला नसल्याने ते अन्यायग्रस्त झाले.  त्या अन्यायाची परंपरा आजही कायम आहे. रामराज्य नेमके काय ही संकल्पना म्हणूनच भारतीयांना समजावून देण्याची गरज आहे!

COMMENTS