Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड नगरपरिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या ?

https://www.youtube.com/watch?v=DsnILUDXbKM बीड : बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली असतानाच बीड नगरपरिषद इमारतीच्या छतावर एका कर्मचाऱ्यानं आयुष्य स

आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
एकलव्य स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत एकात्मिक शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

बीड : बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली असतानाच बीड नगरपरिषद इमारतीच्या छतावर एका कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं असून, गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृताचे नाव अविनाश धांडे (वय अंदाजे 40 वर्षे) असे असून, ते नगरपरिषदेच्या वसुली विभागात कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही हत्या कि आत्महत्या यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी कामावर आले. तिथं ते इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेले असता एका शिडीला कोण व्यक्ती गळफास घेतल्याचं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी त्वरित ही माहिती वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना दिली. ज्यानंतर बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

COMMENTS