Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी विवाहसोहळ्यात भामट्यांची धूम ; नवरीचे दागिने लंपास

https://www.youtube.com/watch?v=PRlYbWCgch4 देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात दोन अज्ञात भामट्यांन

बुलेटस्वारांचा ’फटाका’ बंद; पोलिसांनी 5 लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला रोलर
अनेर धरणा मधून, अनेर नदीत पाणी सोडण्यात यावे यासाठी बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरती रास्ता रोको आंदोलन
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या : मुंडे

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात दोन अज्ञात भामट्यांनी नवरीचे सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पलायन केल्याची घटना घडली असून, शहरात खळबळ उडाली आहे.

            लोणी येथील अनिकेत ऊर्फ भूषण बाबासाहेब दिवटे आणि वांबोरी येथील श्वेता चोथे यांचा विवाह सोहळा राहुरीतील विठ्ठला लॉन्स येथे आज (दि. ७ नोव्हेंबर) दुपारी पार पडणार होता. त्याआधी दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री नवरदेव व नवरीकडील पाहुणे आनंदात गप्पा मारत असताना ही घटना घडली.

COMMENTS