Homeताज्या बातम्या

फायदा आणि तोटा पाहणारे आम्ही नाहीततेलगाव येथे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे अडीच हजार वर्षांपासून विचारांचे भांडण आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हा मुद्दा संघप्र

उपवर्गीकरणविरोधी लाँग मार्च रोखण्याचा प्रयत्न; रांजणगावात रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच
उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे अडीच हजार वर्षांपासून विचारांचे भांडण आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हा मुद्दा संघप्रणीत भाजप सरकारने पुढे आणला असून आज राज्यातील 58 अनुसूचित जाती या निर्णयाविरोधात ठामपणे उभ्या आहेत. फायदा आणि तोटा पाहणारे आम्ही नाहीत. संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कावर घाला घालण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशारा लाँग मार्चचे प्रणेते सिद्धार्थ शिनगारे आणि अजय सरवदे यांनी दिला.
   माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे मंगळवारी (ता.7) जुलै रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात आयोजित निदर्शनादरम्यान ते बोलत होते. यावेळी दयानंद स्वामी, विजय साळवे, अमोल डोंगरे, रानबा उजगरे, डॉ.संजय नाकलगावकर,
सचिन उजगरे, विलास शिंदे, इंजि प्रशांत उघडे, सिद्धार्थ मायंदळे, वाल्मिक पाईक, वामन पाईक,
आदींसह समाज मोठ्या संख्येने सहभागी होता.
  यावेळी शिनगारे आणि सरवदे म्हणाले, आरक्षणाचे उपवर्गीकरण करून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचे आणि आरक्षण शून्य करण्याचे षडयंत्र सुरू आहे. हा निर्णय कोणत्याही एका समाजाच्या हिताचा नसून सर्व अनुसूचित जातींच्या अधिकारांवर परिणाम करणारा आहे. उपवर्गीकरण झाल्यास मातंग समाजालाही त्याचा फटका बसणार असून त्यांचेही आरक्षण कमी होणार आहे. त्यामुळे हा निर्णय कोणाच्याही फायद्याचा नाही.
   ते पुढे म्हणाले, बदर आयोगाचा अहवाल जाहीर न करताच हरकती मागविण्यात येत आहेत. अहवालच सार्वजनिक केलेला नसताना हरकती मागविणे कितपत योग्य आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे. मुंबईत मोठा मोर्चा झाल्यानंतर आता राज्यभर गावोगावी उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलने होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 58 अनुसूचित जातींवर हा निर्णय का लादला जात आहे, याचे स्पष्टीकरण द्यावे.
राज्य सरकारने 1 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ 31 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आमचा ठाम विरोध असून हा निर्णय मागे घेतल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निदर्शनात परिसरातील आंबेडकरी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
———-
पाटोदा-नायगाव चे भूमिपुत्र ह.मुक्काम बालेपीर बीड डॉ.आहाद मजीद शेख यांनी किर्गिज़स्तान या देशातून ’एमबीबीएस’ (चइइड) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.त्यांच्या या अलौकिक आणि दैदिप्यमान यशामुळे त्यांचा त्यांचे वडील जिल्हा विस्तार अधिकारी शेख माजीद यांच्या निवास्थानी परिवार व मित्रा कडून सत्कार करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.  
यावेळी अब्दुल कादर (जमाते आमिर नायगांव) शेख जफर, शेख अजीम,शेख मजीद.शेख साजीद. पत्रकार हमीदखान पठाण,शेख अजीम सर,शेख अनस उपस्थित होते.

COMMENTS