Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हे, स्वराज्यरक्षक

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप-शिंदे गट आक्रमक

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते. काही लोक जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख ‘धर्मवीर’ असा करतात, असे वक्

पूरग्रस्तांना 10 हजाराची मदत
आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका
विकासकामांवरील स्थगिती अजित पवारांनी उठवली

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते. काही लोक जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख ‘धर्मवीर’ असा करतात, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केले होते. त्याचे पडसाद शनिवारी राज्यभर बघायला मिळाले. अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजप आणि शिंदे गटाने निषेध करत, थेट त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या या वक्तव्यानर शंभूराजे देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि धर्मरक्षकच होते. त्यांनी हिंदू धर्मासाठी 40 दिवस अनन्य हाल भोगले, असे प्रत्युत्तर देसाईंनी दिले. राज्यात याचा मोठा उद्रेक होईल, असा इशाराही शंभूराजे देसाई यांनी दिला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरही होते आणि स्वराज्य रक्षकही होते असे म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली होती. निष्पापांना तुरुंगात टाकण्यापेक्षा महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना तुरुंगात टाका, त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये असे ते म्हणाले. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा अशी मागणी करताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते. असे ते म्हणाले. काही जण मुद्दामहून त्यांना धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र अनेक जण जाणीवपूर्वक धर्मवीर असा उल्लेख करतात असे ते म्हणाले. महापुरुषांच्या अवमानावरुन इतरांना बोलणारे अजित पवार हे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वता कोरडे पाषाण अशी टीका शंभूराजे देसाई यांनी केली. हे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संभाजीमहाराज धर्मवीरही होते ः उपमुख्यमंत्री फडणवीस
यासंदर्भात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असतांना, माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ‘छत्रपती संभाजी महाराजांनी खर्‍या अर्थाने धर्माचे रक्षण केले. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचे रक्षण केले. मुळात त्यांना कोणत्या कारणावरून मारण्यात आले हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदू धर्माचा त्याग करा, असे औरंगजेब त्यांना सांगत होता. पण, त्यांनी ते मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा भोगून त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करण्यात आले. तरीही त्यांनी स्वराष्ट्र, स्वधर्म आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही,’ असे फडणवीस म्हणाले. ‘अजित पवार व त्यांच्या विचारांच्या लोकांनी काही वेगळा दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नसल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

COMMENTS