Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित – विनोद कळेकर

नेकनूर । प्रतिनिधी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रदर्

रिपब्लिकन सेना बीड लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी पुरुषोत्तम (गोटू) वीर यांची  निवड
घरकुल हप्त्यांवर प्रशासनाची दिरंगाई
बीड तालुक्यात मोफत वाळू वितरणातून घरकुलधारकांना मोठा दिलासा

नेकनूर । प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणप्रेमी विनोद कळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, भविष्यातील शास्त्रज्ञ घडण्यासाठी भक्कम पायाभरणी व्हावी तसेच नवीन कल्पना व वैज्ञानिक प्रकल्पांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देत त्यांच्या अंगी दडलेल्या कौशल्यांना वाव मिळावा हा देखील प्रदर्शनामागील प्रमुख हेतू होता. या प्रदर्शनामध्ये सुमारे 40 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत विविध वैज्ञानिक प्रयोग व प्रकल्प सादर केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून विविध प्रयोगांची माहिती दिली असून विद्यार्थ्यांनीही आकर्षक व उपयुक्त प्रयोग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी बोलताना उद्घाटक विनोद कळेकर म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, संशोधनाची वृत्ती आणि तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भविष्यातील वैज्ञानिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS