Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन सादर

अंबाजोगाई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. जिल

बीड जिल्ह्याचा ‘साखर पॅटर्न’: गंगा माऊली शुगरने ओलांडला 5.50 लाख टनांचा टप्पा!जिल्ह्यात सर्वाधिक 11 टक्क्यांचा साखर उतारा; ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण
माझ्या दिव्यांग व शिक्षक बांधवांना तसेच गुणी विद्यार्थ्यांना अच्छे दिन यावेत यासाठी रोजा धरणार – राजेंद्र लाड
तुम्ही ग्रामीण भागात सेवा द्या, मी डाक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रात प्रयत्न करतो

अंबाजोगाई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यात वाढत असलेल्या अंधश्रद्धा, भोंदूगिरी व जादूटोणा प्रकरणांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, देवी शक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी लोकांची आर्थिक फसवणूक तसेच मानसिक छळ होत असून काही प्रकरणांमध्ये महिलांचे शोषणही होत आहे. यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून त्याची माहिती जाहीर करावी, तसेच गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर जनजागृती कार्यक्रम राबवावेत, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकृत करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS