Homeताज्या बातम्या

‘ऑपरेशन फ्लश आऊट’ला मोठे यश; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेकडून आंतरजिल्हा जबरी चोरी आणि स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद, ३ गुन्हे उघड

नांदेड : नांदेड जिल्हा व परिसरात महामार्गांवर प्रवाशांना अडवून मारहाण करणे, मोबाईल व वाहने हिसकावून नेणे अशा जबरी चोरी आणि स्नॅचिंगच्या गुन्ह्यां

कसारपेठेत हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; २५ हजारांचे रसायन नष्ट, गावपातळीवरील जबाबदारांनाही कारवाईचा इशारा
तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून; २४ तासांत ४ आरोपी जेरबंद, भोकर पोलिसांची दमदार कामगिरी
२४ तासांत तीन खून, एक जीवघेणा हल्ला; नांदेड जिल्ह्यात संतापाचा स्फोट, कायदा-सुव्यवस्थेसमोर नवे आव्हान
Control the Capital's rising crime graph | Hindustan Times

नांदेड : नांदेड जिल्हा व परिसरात महामार्गांवर प्रवाशांना अडवून मारहाण करणे, मोबाईल व वाहने हिसकावून नेणे अशा जबरी चोरी आणि स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) महामार्गावर दहशत निर्माण करणाऱ्या तीन अट्टल आरोपींना अटक केली आहे. या धडक कारवाईत १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथके तैनात केली होती. १५ जून २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) रवी वाहुळे व त्यांच्या पथकाला शेख आरबाज, मोहम्मद मतीन आणि आरफात सय्यद हे चोरीचे मोबाईल विक्रीसाठी ईदगाहजवळील वाजेगावकडे जाणाऱ्या पुलाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ चोरीचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद आरफात सय्यद हुसेन (वय २६, रा. देगलूर नाका, नांदेड), मोहम्मद मतीन ऊर्फ तंडी मोहम्मद मुजफ्फर (वय २८, रा. देगलूर नाका, नांदेड) आणि शेख आरबाज शेख अजीज (वय २१, रा. हातई इतवारा, नांदेड) यांचा समावेश आहे. आरोपींनी बिलोली-नरसी रोड, नरसी-हैदराबाद रोड, नायगाव परिसर तसेच मारतळा गावाजवळील कांकांडी परिसरात रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे रामतीर्थ पोलीस ठाण्यातील दोन आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास रामतीर्थ पोलीस करत आहेत.

COMMENTS