Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णालयाच्या किचनमधून गॅस सिलेंडरची चोरी

बुलडाणा : देशभरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत चर्चा सुरू असताना बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरि

एकत्रीकरणाच्या चर्चा इतिहास जमा म्हणणारे कुठे गेले?
राज्यात एलपीजी गॅस पुरवठा नियमित सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा ; अफवा न पसरवण्याचे विरोधकांना आवाहन
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक


बुलडाणा : देशभरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत चर्चा सुरू असताना बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असताना एका चोरट्याने थेट रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातून भरलेला गॅस सिलिंडर पळवला. बुलडाणा शहरातील क्षयरोग आरोग्यधाम म्हणजेच टीबी रुग्णालयात ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. चोरट्याने रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या ठिकाणी एकूण सतरा गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते.

COMMENTS