Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नर्णय झाला तोच दर बाजार समित्यांनीही द्यावा ः उत्तम पुणे

कोपरगांव .प्रतिनिधीः विविध पातळीवरील मागणी व चर्चेनंतर सरकारने पुन्हा 2 लाख मे. टन कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत 2,410/-रूपये दराने नाशिक,अहमदनगर

सासूरवाडीतील मुक्कामावरून दाम्पत्यात वाद… पत्नीचा मृत्यु
कोठला परिसरात गोवंशीय मांसासह एकास अटक
रत्नदीप संस्थेस एम.फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी

कोपरगांव .प्रतिनिधीः विविध पातळीवरील मागणी व चर्चेनंतर सरकारने पुन्हा 2 लाख मे. टन कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत 2,410/-रूपये दराने नाशिक,अहमदनगर व शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला. मग सरकार जर या दराने कांदा विकत घेणार असेल. तर ज्या बाजार समित्या शेतकर्‍यांसाठी आहे. त्यांनी देखील त्याच दराने समितीत येणारा 90 टक्के कांदा खरेदी करण्यास शेतकरी व बाजार समिती प्रशासनाने भाग पाडावे. असे मत कांदा उत्पादक व शेती प्रश्‍नाचे अभ्यासक उत्तम पुणे यांनी व्यक्त केले.

बाजारात होणार्‍या आवकेत केवळ एकास उच्च भाव देऊन बाकीचा माल सरासरीच्या नीच्चत्तम दराने खरेदी होणार नाही. याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक ठिकाणी एक दोन वक्कल उंच भाव व सरासरी भावात मोठी तफावत आढळते. त्यामुळे 2 शेतकरी खुश करून 98 शेतकरी लुटले जातात. उंच भाव बघून, ऐकून दुसर्‍या दिवशी माल नेला तर भाव पाडले जातात. आहे त्या भावात माल देऊन शेतकरी हताश होतो. तेंव्हा सरकारने निर्णय घेतलेला 2,410/-रू.भाव ज्यास्तीत जास्त शेतकर्‍यांना कसा मिळेल. याचे नियोजन बाजार समित्यांनी करावे. तसा आग्रह शेतकर्‍यांनी धरावा.

COMMENTS