Homeताज्या बातम्या

तुलसी फॅशन डिझाईन कॉलेजमध्ये वन महोत्सव सप्ताह उत्साहात साजरा

बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागाच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते तथ

तुलसी शैक्षणिक समूहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
महिला सक्षमीकरणासाठी ‘तुलसी क्रिएशन’चा उपक्रम प्रेरणादायी – महापौर वंदनाताई मगरे
तुलसी आयटी कॉलेजमध्ये नेत्रदानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती


बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागाच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 1) ’वन महोत्सव सप्ताह-2026’ विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षणाची ’हरित शपथ’ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. तसेच महाविद्यालयातील कार्यालये, विविध विभाग आणि वर्गखोल्यांमध्ये कुंडीतील शोभिवंत रोपे ठेवून परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपप्राचार्या श्रीमती सय्यद शहाना यांनी पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे सांगत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्वेता वंजारे यांनी केले. सूत्रसंचालन शिवानी खुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीमा प्रजापती हिने मानले. या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. विद्या अवघडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS