Homeताज्या बातम्याविदेश

इम्रान खान यांना 10 वर्षांचा तुरुंगवास

इस्लामाबाद ः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना सिफर प्रकरणात न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इ

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख | LokNews24
संगमनेरमध्ये निसर्गप्रेमी एकवटले
राज्य विधिमंडळाचा 9 मार्चला अर्थसंकल्प

इस्लामाबाद ः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना सिफर प्रकरणात न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान यांचे माजी सहयोगी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान आणि महमूद कुरैशी यांच्या विरोधातला सिफर प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. इम्रान खान यांनी अत्यंत गोपनीय माहिती ही सार्वजनिक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सत्तेतून इम्रान खान यांना बेदखल करण्यात आले त्यानंतर त्यांनी यामागे अमेरिका असल्याचे म्हटले होते.  इम्रान खान आणि त्यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान यांना हा मोठा झटका मानला जातो आहे.  सिफरचे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. अत्यंत गुप्त माहिती वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचा इम्रान खान यांच्यावर आरोप आहे.

पाकिस्तानात 8 फेब्रुवारीमध्ये निवडणूक – पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीच्या दिवशी निवडणूक होणार आहे. त्याआधी माजी पंतप्रधान नवाज शरीफ पाकिस्तानला परतले आहेत. त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तान सोडले होते आणि ब्रिटनला राहिलो हेत. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला त्यानंतर नवाज शरीफ पाकिस्तानला परतले आहेत. आता निवडणुकांसाठी अवघे नऊ दिवस उरलेले असताना इम्रान खान यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

COMMENTS