Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कॉकरोच जनता पार्टीवर तातडीची सुनावणी नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सीबीआय चौकशीची होती मागणी

नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' प्रकरणातील दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार

राजधानीतील आंदोलकांवर बळाचा वापरलाठीचार्जसह अश्रुधूराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवले
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा
जंतर-मंतरवर पुन्हा वाढली आंदोलनाची धार; हजारो विद्यार्थी जमले एकत्र, पोलिसांचा मोठा ताफा तैनात
SC declines urgent hearing on plea seeking probe into Cockroach Janta Party

नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ प्रकरणातील दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच ‘सीबीआय’ (CBI) कडून चौकशी करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आले की, संबंधित सोशल मीडिया पानामुळे (Page) न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होत असून, त्याविरोधात त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने, “प्रकरणाकडे इतक्या भावनिक दृष्टिकोनातून पाहू नका,” असे निरीक्षण नोंदवले.

ही याचिका अधिवक्ता राजा चौधरी यांनी दाखल केली आहे. त्यांनी आंदोलनाशी संबंधित काही व्यक्तींकडून बनावट वकिली आणि खोट्या कायद्याच्या पदव्यांचा वापर होत असल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, न्यायालयीन कार्यवाहीतील तोंडी निरीक्षणांचा व्यावसायिक वापर होत असल्याबाबतही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यावर सरन्यायाधीशांनी, “सध्या कोणतीही गंभीर आपत्कालीन परिस्थिती नाही,” असे सांगत पुढील घडामोडींवर लक्ष ठेवले जाईल, असे स्पष्ट केले.

‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे सोशल मीडिया पेज १६ मे रोजी अभिजीत दीपके यांनी सुरू केल्याचे समोर आले आहे. या पेजला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, लाखो लोकांनी ते फॉलो केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने ही उपाययोजना खबरदारीचा भाग असल्याचे सांगितले असून सोशल मीडियावरील चर्चेमुळे परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

COMMENTS