Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमेरिकन निर्बंधांविरोधात व्हेनेझुएलात असंतोष

काराकास : व्हेनेझुएला मधील जनतेचा रोष आता उघडपणे रस्त्यावर उतरू लागला आहे. अमेरिका सरकारने लादलेल्या आर्थिक निर्बंधांविरोधात देशभर व्यापक आंदोलन

पेट्रोकेमिकल क्षेत्राला दिलासा; 40 उत्पादनांवरील सीमा शुल्क माफ
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर इराण टोल आकारणार; इराणच्या संसदेत मंजुरी; पश्‍चिम आशियात तणावाची नवी ठिणगी
अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा
व्हेनेझुएलातील उठाव – Prahaar.in

काराकास : व्हेनेझुएला मधील जनतेचा रोष आता उघडपणे रस्त्यावर उतरू लागला आहे. अमेरिका सरकारने लादलेल्या आर्थिक निर्बंधांविरोधात देशभर व्यापक आंदोलन छेडण्यात आले असून, राजधानी काराकाससह विविध शहरांत मोर्चे, सभा आणि निषेध रॅलींची मालिकाच सुरू झाली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होर्हे रोड्रिगेज करत आहेत. सान फेलिक्स येथील सेरो एल गॅलो परिसरात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ठाम शब्दांत निर्बंध संपवण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या प्रगतीला अडथळा ठरणारे हे निर्बंध हटवणे अत्यावश्यक आहे, असे सांगत त्यांनी जनतेला एकजुटीचे आवाहन केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या देशव्यापी मोहिमेची सुरुवात 19 एप्रिलपासून झाली असून, त्याला कार्यवाहक राष्ट्रप्रमुख डेल्सी रोड्रिगेज यांनी प्रारंभ केला. झुलिया, ताचिरा, अमाझोनास यांसारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित होत असून, आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक तीव्र स्वरूप येत आहे. डेल्सी रोड्रिगेज यांनी निर्बंधांचा सामाजिक परिणाम अधोरेखित करताना सांगितले की, गेल्या जवळपास दशकभरापासून लागू असलेल्या या उपाययोजनांचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. विशेषतः लहान मुलांवर त्याचे गंभीर परिणाम झाले असून, त्यांच्या मूलभूत गरजा आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक संधी मर्यादित झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे आंदोलन केवळ राजकीय प्रतिक्रिया नसून आर्थिक आणि सामाजिक प्रश्‍नांशी जोडलेले व्यापक जनआंदोलन असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम करणे, तसेच जागतिक पातळीवर सहकार्याचे दरवाजे खुले करणे, हा या संघर्षाचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावात काही प्रमाणात शिथिलता आल्याचे संकेतही मिळत आहेत. अलीकडेच अमेरिकेने डेल्सी रोड्रिगेज यांच्यावरील काही निर्बंध सैल केले असून, हा निर्णय संबंध सुधारण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल मानला जात आहे. तरीही, व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील संबंध अद्याप पूर्णपणे सामान्य झालेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर 1 मे रोजी काराकास येथे भव्य समारोप रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS