Homeताज्या बातम्याशहरं

काळुंद्रे-खराळे-चिंचेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी संपादीत जमिनींचा मोबदला कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

शिराळा / प्रतिनिधी : पाण्यापासून वंचित असलेल्या शिराळा तालुक्याच्या पश्‍चिम भागातील काळूंद्रे, खराळे, चिंचेवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्‍न कायस्वर

मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुवर्ण पदकाने सुजित देशमुख सन्मानीत
संविधान दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर

शिराळा / प्रतिनिधी : पाण्यापासून वंचित असलेल्या शिराळा तालुक्याच्या पश्‍चिम भागातील काळूंद्रे, खराळे, चिंचेवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्‍न कायस्वरुपी मार्गी लागावा. यासाठी सरकारने सन 2009-2010 मध्ये या गावांसाठी उपसा सिंचन योजना राबविण्याचे ठरविले. यासाठी एकूण पाच तलाव बांधण्याची गरज होती. यापैकी काळुंद्रे येथे एक, खराळे येथे दोन तर चिंचेवाडी या ठिकाणी दोन असा आराखडा तयार करण्यात आला. कोणतेही खरेदीपत्र न करता अनेक शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, 12 वर्षे उलटून गेली तरी अद्यापही शेतकर्‍यांना या जमिनींचा कसल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही.
12 वर्षानंतर पूर्णत्वास गेलेल्या या कामाचे उद्घाटन माजी आमदार शिवाजीराव नाईक व माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या हस्ते वाजत गाजत करण्यात आले. मात्र, या कामासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या. त्या शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा प्रशासनासह सगळ्यांनाच सोयीचा विसर पडला असल्याचे दिसत आहे.
या परिसरातल्या शेत शिवारांमध्ये आता जरी पाणी खळखळू लागले असले तरी त्यापाठीमागे ज्यांच्या जमिनी गेल्या. त्यांच्या अनेक व्यथा दडल्या आहेत. कधीतरी आम्हाला या जमिनींचा मोबदला मिळेल. याच्या प्रतिक्षेत या शेतकर्‍यांनी तब्बल 12 वर्षे काढली आहेत. काहींनी तर याच्या प्रतिक्षेत जगाचा निरोप घेतला आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

COMMENTS