Homeताज्या बातम्या

कतारमधील स्फोटात १३ ठार तर, ६६ जण गंभीर जखमी

कतार : कतारमधील रास लफान औद्योगिक शहरात झालेल्या स्फोटात भारतीयांसह किमान १३ जण ठार झाले, अशी माहिती कतारचे ऊर्जा मंत्री साद बिन श्रेदा अल-काबी य

अमेरिका-इराण युद्धाचा पुन्हा भडका; इराणसाठी होर्मुझ सामुद्रधुनी हे सर्वात मोठे शस्त्र
शाळा आणि मुलांवरील हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावीसंयुक्त राष्ट्रसंघात भारतीय राजदूतांनी मांडली ठाम भूमिका
भारत-अमेरिका करार अंतिम टप्प्यात! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार
कतारमध्ये भीषण दुर्घटना: रास लाफान औद्योगिक शहरात स्फोट, १३ जणांचा मृत्यू,  मृतांमध्ये भारतीयांचा समावेश - पुरोगामी विचाराचे एकमत

कतार : कतारमधील रास लफान औद्योगिक शहरात झालेल्या स्फोटात भारतीयांसह किमान १३ जण ठार झाले, अशी माहिती कतारचे ऊर्जा मंत्री साद बिन श्रेदा अल-काबी यांनी दिली.

रविवारी संध्याकाळी रास लाफान औद्योगिक शहरातील बरझान स्थानिक गॅस पुरवठा केंद्रात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ६६ जण जखमी झाले. या घटनेत भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या १३ जणांचा मृत्यू झाल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान अल-काबी यांनी सांगितले.

भारतीय बळींची नेमकी संख्या तातडीने कळू शकली नाही. दोहा येथील भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून मरण पावलेल्या किंवा जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही दूतावासाने म्हटले आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमींमध्ये भारत, कतार, टांझानिया, पाकिस्तान, गिनी, नेपाळ, बांगलादेश, केनिया आणि नायजेरियासह विविध देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

या स्फोटात अनेकजण जखमी झाले असून काहीजण बेपत्ता आहेत. भारतीय दूतावासाने या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद पथके तातडीने तैनात करण्यात आली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

COMMENTS