Homeताज्या बातम्या

युनियन बँक मरखेल शाखेत ग्राहकांची गैरसोय?कामे वेळेवर होत नसल्याने खातेदारांमध्ये नाराजी

मरखेल येथील युनियन बँकेच्या शाखेत विविध बँकिंग कामांसाठी येणार्‍या ग्राहकांना वारंवार फेर्‍या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काम

बाळूमामा मंदिरात 60 कोटींचा घोटाळा? उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा
राष्ट्रीय महामार्गावर चार रानडुकरांचा मृत्यू; अपघात की शिकार? चर्चांना उधाणदोन मृतदेह गायब, उर्वरित दोन सडल्याने दुर्गंधी; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
डमी प्रवेशांना लगाम; कोचिंग लॉबीवर शिक्षण विभागाचा मोठा प्रहार!नांदेडमधील 256 कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची; 75 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असेल तर 12 वी परीक्षा धोक्यात



मरखेल येथील युनियन बँकेच्या शाखेत विविध बँकिंग कामांसाठी येणार्‍या ग्राहकांना वारंवार फेर्‍या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कामे वेळेवर होत नसल्याने तसेच काही प्रकरणांमध्ये टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अनेक खातेदारांनी केला आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, खाते होल्ड काढणे, केवायसी अद्ययावत करणे, खाते स्टेटमेंट मिळवणे, पासबुक अद्ययावत करणे, धनादेशाशी संबंधित कामे, रोख रक्कम जमा किंवा काढणे तसेच विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी अनेकदा बँकेत वारंवार यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अलीकडेच खातेदार श्रीराम गोविंदराव नागनपल्ले हे खाते होल्ड काढण्याच्या कामासाठी शाखेत गेले असता, आवश्यक टोकन मिळविण्यासाठी त्यांना टोलवाटोलवीचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संबंधित खातेदारासह इतर ग्राहकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. काही खातेदारांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक प्रतीक्षेत असताना काही कर्मचारी मोबाईलचा वापर करत असल्याचेही दिसून येते. मात्र, तक्रार केल्यास स्वतःची कामे आणखी विलंबित होतील, या भीतीमुळे अनेक ग्राहक उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. या सर्व आरोपांची वस्तुस्थिती तपासण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शाखेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून निष्पक्ष चौकशी करावी आणि ग्राहकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळावी, अशी मागणी खातेदारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात संबंधित शाखा व्यवस्थापक व युनियन बँकेची अधिकृत भूमिका मिळू शकलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

COMMENTS