Homeताज्या बातम्या

राज्यातील विद्यापीठांना आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व्यवस्थेत एकसमानता आणण्याचा न

चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा
काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)
चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र  राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक संपन्न - First ...

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व्यवस्थेत एकसमानता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून समान शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची तयारी, परीक्षा पद्धती, क्लस्टर अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी यावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आठवड्यातून एक दिवस ५० विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी सूचना पाटील यांनी केली. प्र-कुलगुरूंनीही दर आठवड्याला ५० विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घ्याव्यात, असे सांगण्यात आले. या संवादातून समोर येणाऱ्या समस्या आणि त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती शासनाला सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नवे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवताना महाविद्यालयांचे क्लस्टर तयार करून उपलब्ध शैक्षणिक साधनसंपत्तीचा अधिकाधिक संयुक्त वापरावर भर देण्यात आला. मनुष्यबळ, प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि पायाभूत सुविधांचा परस्पर वापर वाढवण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या. मुंबई विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी तयार केलेल्या क्लस्टर अभ्यासक्रमांचा अभ्यास करून राज्यासाठी दर्जेदार आणि व्यापक अभ्यासक्रम विकसित करण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रत्येक विद्यापीठाने दर महिन्याला किमान एक क्लस्टर उपक्रम राबवावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS