Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘भावलेली माणसं’ हे पुस्तक म्हणजे माणुसकीची संजीवनी : प्रा. डॉ. कैलास पवार

श्रीरामपूर : संगमनेर येथील स्वाध्याय परिवाराचे सदस्य आणि माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सावळाराम रसाळ गुरुजी यांनी वयाच्या ९० व्या वर्षी लिहिलेले 'भ

वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून खासदार, आमदारांनी रूग्णसेवेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दयावा – कोल्हे
कळस बुद्रुक शाळेचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत चमकले
कोपरगाव नगरपरिषदेस १ कोटींचे अनुदान : संधान

श्रीरामपूर : संगमनेर येथील स्वाध्याय परिवाराचे सदस्य आणि माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सावळाराम रसाळ गुरुजी यांनी वयाच्या ९० व्या वर्षी लिहिलेले ‘भावलेली माणसं’ हे पुस्तक म्हणजे माणुसकीची संजीवनी आहे, असे प्रतिपादन भूमी फाउंडेशन सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. कैलास पवार यांनी केले.

येथील ‘वाचन संस्कृती प्रतिष्ठान’तर्फे रसाळ गुरुजी लिखित ‘भावलेली माणसं’ या पुस्तकावर आयोजित चर्चा आणि संवाद कार्यक्रमात डॉ. कैलास पवार बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत व प्रास्ताविक करून लेखक आणि पुस्तकाचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. कैलास पवार व सौ. अनिता पवार यांनी अनाथ आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी वाघोली येथे वसतिगृह सुरू केल्याबद्दल या उभयतांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. सौ. मंदाकिनी उपाध्ये व गणेशानंद उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

यावेळी अनेक वक्त्यांनी पुस्तकावर आपले मनोगत व्यक्त केले. रसाळ गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनुभवातील माणसे या पुस्तकात चित्रित झाली असून, नवोदित साहित्यिक, विद्यार्थी आणि सुज्ञ वाचकांसाठी हे पुस्तक जीवन दिशादर्शक ठरेल, असे विवेचन मान्यवरांनी केले.

अनिता कैलास पवार यांनी ‘सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थिनी वसतिगृहा’च्या कार्यपरिचयाची माहिती दिली. अभिनेत्री अलकाकुबूर (अलका कुबल), माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य शंकरराव अनापसे, किशोर निर्मळ, सुखदेव सुकळे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, राजेंद्र देसाई, भीमराज बागुल, बाबासाहेब चेडे, डॉ. संगीता फासाटे/कटारे यांच्यासह अनेक शासकीय पदाधिकारी व देणगीदारांचे या सेवाकार्याला सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला भाग्यश्री पवार, ईशान पवार, निर्मिक उपाध्ये व वाचन संस्कृती परिवाराचे सदस्य उपस्थित होते. गणेशानंद उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

COMMENTS