Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादरमध्ये अनाधिकृत फुले विकणारे रडारवर

महानगरपालिकेकडून विके्रत्यांविरूद्ध कारवाई

मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा फुलविक्रेत्यांविरूद्ध महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, अनाधिकृत फुले विकणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बीडमध्ये पंचतारांकित एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; पुढील आठवड्यात मंत्रालयात महत्त्वाची बैठक
कृषी दुकानदारांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट थांबवा अन्यथा तोंडाला काळे फासु – गणेश बजगुडे
इंदौरमध्ये गॅस पाइपलाइन लीक झाल्याने भीषण स्फोट; अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळले

मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा फुलविक्रेत्यांविरूद्ध महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, अनाधिकृत फुले विकणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दादरमधील फुल बाजारातील रस्ता अडवून अनधिकृतपणे फुलांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई केली. अतिक्रमण निर्मुलन विभाग आणि घनकचरा विभागाने संयुक्तपणे सकाळी 9 वाजता ही कारवाई केली. नवरात्र आणि दिवाळी जवळ आल्यामुळे दादरमध्ये फुल विक्री करणार्‍या फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे.
मीनाताई ठाकरे फुल बाजाराच्या बाहेर रस्त्यावर फुलांची मोठी टोपली घेऊन अनधिकृतपणे फुल विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांची संख्याही वाढू लागली आहे. यामध्ये वाघरी समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. रस्ता अडवल्यामुळे पादचार्‍यांना चालायलाही जागा मिळत नाही. तसेच हे विक्रेते फुलांचा कचरा तसाच रस्त्यावर टाकून निघून जातात. गेल्याच आठवड्यात जी उत्तर विभागाने फुल बाजारातील व्यापार्‍यांना कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र मंडईबाहेर बसणारे विक्रेते जुमानत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे घनकचरा विभागाने अतिक्रमण निर्मुलन विभागाची मदत घेऊन गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. गुरुवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत हा बाजार सुरू होत असतानाच ही कारवाई करण्यात आली. किमान 15 ते 20 विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून सुमारे 100 किलो माल जप्त केला.

COMMENTS